कारच्या डॅशबोर्डमध्ये 'ही' लाईट लागली की, लगेच कारमधून उतरा आणि दुर पळा, नाहीतर...

कंपन्या त्यांच्या कार शक्य तितक्या सुरक्षित करण्यावर भर देत आहेत. यासाठी सर्व प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Updated: Aug 14, 2022, 09:30 PM IST
कारच्या डॅशबोर्डमध्ये 'ही' लाईट लागली की, लगेच कारमधून उतरा आणि दुर पळा, नाहीतर... title=

मुंबई :  तंत्रज्ञानाच्या बाबतीत कार खूप प्रगत होत चालल्या आहेत. कंपन्या आपल्या कार तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनविण्यावर अधिक भर देत आहेत आणि या संदर्भात संशोधन देखील सुरु आहे. परंतु हे देखील तेवढंच खरं आहे की, कारमधले फीचर्स जितके जास्त तितकं ती कार महाग. कारण हे सगळं तत्रंज्ञान बसवण्यासाठी किंवा त्याचा रिसर्च करण्यासाठी कंपनीला खूप जास्त खर्च येतो. परंतु हे देखील तेवढंच खरं आहे की, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या चांगली कार घ्याल तर त्याचा फायदा देखील जास्त आहे.

कंपन्या त्यांच्या कार शक्य तितक्या सुरक्षित करण्यावर भर देत आहेत. यासाठी सर्व प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये विविध प्रकारचे सेन्सर दिले जात आहेत, जे त्यांना अधिक सुरक्षित बनविण्यात मदत करतात.

सध्या अशा अनेक कार बाजारात आल्या आहेत, ज्या ऑटोमेटीक आहेत. तसेच त्या सेन्सर्सद्वारे स्वतः ड्रायव्हरला सर्व प्रकारचे संकेत देतात. तुम्ही तुमच्या कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये (कारच्या समोरच्या डिस्प्लेवर) देखील पाहिले असेल, तेथे अनेक वेगवेगळी चिन्हं बनवलेली आहेत. तेथील प्रत्येक चिन्हाचा स्वतःचा अर्थ असतो. त्यामुळे कार मालक किंवा ड्रायव्हर म्हणून, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसणार्‍या सर्व चिन्हांचा अर्थ माहित असणे आवश्यक आहे.

येथे तुम्हाला बॅटरी, पेट्रोल, सीट बेल्ट, दरवाजा उघडा असणे इत्यादींशी संबंधित सर्व चिन्हे मिळतात, ज्यावरून ड्रायव्हरला एक संकेत मिळतात. अनेक गाड्यांच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये कारचे इंजिन गरम असण्याची चिन्हेही आढळतात. या चिन्हाचा दिवा पेटल्यास चालकाने ताबडतोब सावध राहिले पाहिजे. कारण हे धोकादायक असू शकते.

इंजिन गरम झाल्यावर काय करावे?

वास्तविक, कारच्या डिस्प्लेवर दिसणारी ही इंजिन संदर्भातील लाईट, इंजिन खूप गरम झाल्यावर जळतो. त्यामुळे हे लक्षात घ्या की अशावेळी गाडीला आग देखील लागू शकते. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये हा दिवा जळताना दिसला, तर ताबडतोब कार बंद करा आणि त्यापासून दूर जा. शक्य असल्यास, कारचे बॉनेट उघडा जेणेकरून इंजिन थंड होईल आणि मग इंजिन इतके गरम कसे झाले ते मेकॅनिकला दाखवा. कोणतीही अडचण असली तरी ती दुरुस्त केल्याशिवाय पुन्हा गाडी चालवू नका.