काहीही कळण्याआधी त्याच्या खात्यातून उडाले 75 लाख, तुम्ही अशी चूक करत नाही ना?

खात्यातून व्यवहार होत असतानाही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेलवर एसएमएस किंवा ईमेल येतो. तो मेसेज देखील या बिल्डरला आला नाही.

Updated: Aug 14, 2022, 08:57 PM IST
काहीही कळण्याआधी त्याच्या खात्यातून उडाले 75 लाख, तुम्ही अशी चूक करत नाही ना? title=

मुंबई : दिल्लीतील शाहदरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने बँक खातेदारांची झोप उडवली आहे. खरे तर हे प्रकरण ऑनलाइन फसवणुकीचे आहे, ज्यामध्ये एका बिल्डरच्या खात्यातून ७५ लाख रुपये काढले गेले आणि त्याला कळलं देखील नाही. महत्वाची गोष्ट अशी की, त्या व्यक्तीने आपल्या खात्याचा तपशील कोणाशीही शेअर केला नव्हता. त्यामुळे आता बँकांवर आणि त्याच्या सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अशा परिस्थितीत खात्यातून एवढी मोठी रक्कम कशी काढली गेली? असा प्रश्न उपस्थीत राहातो

खात्यातून व्यवहार होत असतानाही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेलवर एसएमएस किंवा ईमेल येतो. तो मेसेज देखील या बिल्डरला आला नाही.

माहितीनुसार, या व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नेट बँकिंगचा वापर केला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, त्याच्या खात्यातून लाख रुपये कापले गेले होते, त्यावेळी या व्यक्तीने जराही विलंब न करता व्यवहार ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 10 लाख रुपये कापले गेले. अशाप्रकारे या बिल्डरचे पूर्ण 75 लाख रुपयाचा गंडा घातला गेला.

हे प्रकरण स्पेशल सेलच्या सायबर क्राईम युनिटकडे पाठवण्यात आले आहे आणि ते आता या प्रकरणाची तपासणी करत आहेत. नक्की असं काय घडलं असावं आणि कोणत्या पद्धतींचा अवलंब करुन या ठग्यांनी फसवणूक केली, हे देखील शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

आता आपण जाणून घेऊ या की अशा कोणत्या चुका लोक करतात, ज्यामुळे त्यांचं खातं रिकामी होऊ शकतं.

जेव्हा तुम्ही तुमचा बँकिंग तपशील काही अनोळखी व्यक्तीला देता, काही वेळा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बनूनही लोक तुमच्या बँक खात्याचे तपशील विचारतात.

जर तुम्ही अशा लोकांच्या जाळ्यात पडलात तर तुमच्यासोबतही ही घटना घडू शकते. तुम्ही तुमचे बँकिंग तपशील गोपनीय ठेवल्यास असे होण्याची शक्यता कमी आहे, परंतु तरीही तुम्ही त्याबद्दल खूप जागरूक असले पाहिजे.

प्रत्येक बँक खातेदाराने ही खबरदारी घ्यावी

1. जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर त्याचे तपशील चुकूनही शेअर करू नका. तसेच ते कुठेही लिहून ठेवू नका.

2. तुमचा कार्ड नंबर आणि CVV खाजगी ठेवा

3. सार्वजनिक वायफायने व्यवहार करू नका

4. स्मार्टफोनमध्ये अनावश्यक अॅप्स डाउनलोड करू नका, तसेच थर्डपार्टी ऍप्सपासून लांब राहा.