मुंबई : राष्ट्रीय ध्वज तिरंगा (National Flag) देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. याची रचना पिंगळी व्यंकय्या (pingali venkayya) यांनी केली होती. सन १९६३ मध्ये आजच्या दिवशी पिंगली व्यंकय्या यांचे निधन झाले. शेवटचा काळात ते झोपडीत राहत होते. त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ अत्यंत गरीबीत गेला. २००९ मध्ये त्याच्या नावाचे टपाल तिकीट काढण्यात आले. तिरंग्याची निमिर्ती करणाऱ्या पिंगळी व्यंकय्या यांनी काही काळ ब्रिटीशांसोबत काम केले.
पिंगळी व्यंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम गावात झाला. त्यानंतर वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी पिंगळी ब्रिटीश सैन्यात प्रवेश घेतला. यानंतरपिंगळी व्यंकय्या यांनी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी यांची भेट घेतली. बापूंच्या संपर्कात आल्यानंतर ते त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेत. त्यानंतर ते कायमचे भारतात परतले. पिंगळी व्यंकय्या यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महत्त्वाचे म्हणजे पिंगळी व्यंकय्या यांनी तिरंगा ध्वज बनविण्यापूर्वी ३० देशांच्या ध्वजांचा अभ्यास केला होता. १९१६ ते १९२१ पर्यंत त्यांनी यावर संशोधन केले. त्यानंतर त्यांनी तिरंगा डिझाइन केला.
१९२१ मध्ये पिंगळी व्यंकय्या यांनी तिरंग्याची निमिर्ती करताना भगवा आणि हिरवा झेंडा बनवून तयार केला. त्यानंतर लाला हंसराज यांनी त्यात एक सूत काढण्याचा चरखा जोडला आणि गांधीजी यांनी त्यात एक पांढरी पट्टी जोडण्यास सांगितली. २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीत राष्ट्रीय ध्वज तिरंगा सध्याच्या स्वरुपात स्वीकारला गेला.