सकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Health Tips : तुमची सकाळची ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. डोकं आणि मानेचा कर्करोग होण्यामागे सकाळची चूक महागात पडते असं एका संशोधनातून दावा करण्यात आलाय.   

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2024, 12:10 AM IST
सकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा  title=
One morning mistake causes head and neck cancer shocking revelation from the study health tips in marathi

Morning Big Mistake Head and Neck Cancer : सकाळी एका चुकीमुळे डोकं आणि मानेच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आलाय. सकाळी उठल्यावर आपल्यापैकी अनेक जण तोंड न धुता दोन ग्लास पाणी पितो. त्यानंतर ब्रेक करतो. अनेकांना सकाळी उठल्यानंतर दात घासण्यास विलंब करतात. अशा स्थितीत डोकं आणि मानेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, तोंडाची स्वच्छता न केल्याने केवळ मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका नाही तर डोकं आणि मानेचा कर्करोग देखील होऊ शकतो. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहणे महागात पडू शकतं. 

अभ्यास काय सांगतो?

कर्करोगाचा धोका आणि तोंडातील काही बॅक्टेरिया यांच्यातील संबंध ओळखण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. एनवाययू लँगोन हेल्थ आणि त्याच्या पर्लमटर कॅन्सर सेंटरच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात असे आढळून आलं की तोंडात राहणाऱ्या शेकडो प्रकारच्या जीवाणूंपैकी डझनहून अधिक जीवाणूंमुळे डोकं आणि मानेच्या स्क्वॅमस पेशींच्या वाढीचा धोका 50 टक्क्यांनी वाढतो. तर या अभ्यासाने तोंडातील काही बॅक्टेरियाचा कर्करोगाशी संबंध जोडला आहे.

तोंडाची स्वच्छता न केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो?

जामा ऑन्कोलॉजी मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात निरोगी पुरुष आणि महिलांकडून गोळा केलेल्या मौखिक जंतूंच्या अनुवांशिक संरचनेवर लक्ष दिलं गेलं. तोंडात नियमितपणे आढळणाऱ्या शेकडो वेगवेगळ्या जीवाणूंपैकी 13 प्रजाती HNSCC चा धोका वाढवतात किंवा कमी करतात. एकूणच, या गटात कर्करोगाचा धोका 30 टक्के जास्त होता. हिरड्यांच्या आजारात आढळणाऱ्या इतर पाच प्रजातींच्या संयोगाने धोका 50 टक्क्यांनी वाढला आहे.

संशोधक काय म्हणतात?

NYU ग्रॉसमन स्कूल ऑफ मेडिसिनमधील लोकसंख्या आरोग्य विभागातील पोस्टडॉक्टरल फेलो क्वाक म्हणाले की, हे जीवाणू बायोमार्कर म्हणून काम करू शकतात जे उच्च जोखीम ओळखू शकतात. क्वाक सांगतात की, पूर्वीच्या तपासणीत या कर्करोगाने ग्रस्त लोकांच्या ट्यूमरच्या नमुन्यांमध्ये काही जीवाणू आधीच आढळून आले होते. त्यानंतर, 2018 मध्ये, सध्याच्या संशोधन कार्यसंघाने हे शोधून काढले की कालांतराने, निरोगी सहभागींमध्ये HNSCC च्या पुढील जोखमीमध्ये सूक्ष्मजंतू कशा प्रकारे योगदान देऊ शकतात. शिवाय याबद्दल अद्याप अधिक संशोधन आवश्यक आहे.

नियमितपणे ब्रश करा

या अभ्यासात सहभागी संशोधकांचे म्हणणंय की नियमितपणे दात घासणे आणि फ्लॉस करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे केवळ पीरियडॉन्टल रोगच नाही तर डोकं आणि मानेचा कर्करोग देखील टाळण्यास मदत करू शकते. तोंडाच्या आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा बाळगू नये, असं संशोधक आणि डॉक्टर सांगतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)