सलग सहाव्या दिवशी डिझेलच्या किमतीत घट, पेट्रोलचे दर स्थिरावले

मंगळवरी सलग साहव्या दिवशी डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत.

Updated: Mar 19, 2019, 06:18 PM IST
सलग सहाव्या दिवशी डिझेलच्या किमतीत घट, पेट्रोलचे दर स्थिरावले title=

नवी दिल्ली : मंगळवरी सलग साहव्या दिवशी डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सतत वाढत असणाऱ्या पेट्रोलच्या दराला पूर्णविराम लागला आहे. तेल व्यापार कंपन्यांनी सलग पाच दिवस वाढत असलेल्या पेट्रोलच्या किंमतीत मंगळवारी कोणत्याही प्रकारचे दर वाढवले नाहीत. पण डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. 

दिल्ली आणि कोलकत्ता मध्ये डिझेलच्या दरात ११ पैशांची घट झाली असून मुंबई आणि चेन्नई मध्ये डिझेलच्या प्रति लिटर मागे १२ पैशांची कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानूसार दिल्ली, कोलकत्ता, मुंबई, चेन्नई मध्ये पेट्रोलचे दर क्रमश: ७२.७८ रूपये, ७४.८६ रूपये, ७८.४० रूपये आणि ७५.५९ रूपये प्रति लिटर आहे आणि चार शहरात डिझेलच्या दरात घट होवून ६६.८० रूपये, ६८.५९ रूपये, ६९.९७ रूपये आणि ७०.५९ रूपये प्रति लिटर झाले आहेत.