Delhi Assembly Election Results 2020 : ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

दिल्लीवर कोण राज्य करणार याची उत्सुकता

Updated: Feb 11, 2020, 07:27 AM IST
Delhi Assembly Election Results 2020 : ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात title=

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडुणकीचा निकाल (Delhi Assembly Election Result 2020) आज 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होताच स्पष्ट होईल की, भारतीय जनता पक्ष 21 वर्षाने दिल्लीच्या सत्ते येणार की नाही? की अरविंद केजरीवल हॅट्रिक करत तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.  70 जागांचे निकाल तुम्हाला सर्वात अगोदर Zee24Taas पाहता येणारच आहे. पण त्याचबरोबर मराठी वेबसाइटवर https://zeenews.india.com/marathi देखील पाहता येणार आहे. 

राजधानी दिल्लीचा कौल कुणाला याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभेची आज मतमोजणी होणार असून दिल्लीवर कोण राज्य करणार याची उत्सुकता साऱ्या देशाला लागलीये. दरम्यान दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षच सत्तेवर येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय.

मात्र भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची करत दिल्लीत सत्ता स्थापनेचा दावा केलाय. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी यासाठी मतदान पार पडलं

दिल्लीत ६२. ५९ टक्के मतदान झालंय. जे लोकसभा निवडणुकीपेक्षा दोन टक्के जास्त आहे. मात्र मतदान संपून २४तास उलटले तरी निवडणूक आयोगानं मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर न केल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केलं. या आक्षेपानंतर निवडणूक आयोगानं रविवारी आकडेवारी जाहीर केली. आता आज दिल्लीकरांनी कोणाला कौल दिलाय हे कळणार आहे.