नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नसल्याने लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशाला ऑरेंज, ग्रीन आणि रेड झोनमध्ये विभागण्यात आले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक राज्य आपआपल्या परिने शर्थीचे प्रयत्न करत आहे. या पार्श्वभुमीवर दिल्ली सरकारने सम विषय फॉर्म्युला आणण्याचे ठरवले आहे. वाढत्या प्रदुषणाच्या समस्येवर उपाय म्हणून वाहनांसाठी हा नियम लागू करण्यात आला होता.
यानुसार जास्त गर्दीवाली ठिकाणी, बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. समविषय नियमानुसार दुकाने खुळी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प सेशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास ग्राहकांसोबत दुकानदारांवर देखील कारवाई केली जाण्याचा इशार मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिला आहे.
आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मंगळवारपासून कामकाजाला सुरुवात करतोय अशी माहिती नवी दिल्ली व्यापारी संघांचे अध्यक्ष अतुल भार्गव यांनी सांगितले. दरम्यान सम विषम फॉर्मुलावर खान मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजीव मेहरा यांनी नाराजी व्यक्त केली.
सरोजिनगर बाजारपेठेतील दुकानं सोमवारपासून खुली राहणार असल्याचे सरोजिनी नगर व्यापार संघाते अध्यक्ष अशोक रंधावा यांनी सांगितले. आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना भेटलो. बाजारपेठेच्या आठ प्रवेशद्वारा आठ पोलीस कर्मचारी तैनात असतील. तसेच बाजारपेठेतर्फे एक व्यक्ती थर्मल चाचणी आणि सॅनिटाईज करेल असे रंधावा म्हणाले.