मुंबईला धोका? देशाला हादरवण्यासाठी पाकिस्तानात आणखी 2 'कसाब' तयार, असा उधळला कट

मोठा घातपात टळला, नाहीतर...... 

Updated: Sep 15, 2021, 07:37 AM IST
मुंबईला धोका? देशाला हादरवण्यासाठी पाकिस्तानात आणखी 2 'कसाब' तयार, असा उधळला कट
प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्ली : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला आहे. दाऊदचा भाऊ अनिस अहमद आणि आयएसासचं कनेक्शन असल्याचं उघड झालं. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्य़ावर असल्याचं उघड झाली. 

सदर प्रकरणी दोन दहशतवाद्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकाला राजस्थानच्या कोटातून तर इतरांना दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून अटक झाली आहे. त्यांच्याकडून आरडीएक्स आणि आयएडी जप्त करण्यात आलं आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून ट्रेनिंग घेतल्याचं उघड झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा तोच ट्रेनिंग कँप होता, जिथं कसाब तयार झाला होता. 

उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार देशातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई करण्याचा या दशतवाद्यांचा कट होता जो आता उधळून लावण्यात आला आहे. 

मुंबईच्या जान मोहम्मदचाही समावेश 
अटक करण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये मुंबईच्या जान मोहम्मद शेखचाही समावेश आहे. मुंबई क्राईम ब्रांचची (Mumbai Crime Branch) टीम त्याच्या सायनमधील घरी पोहोचली. ज्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आला. यानिमित्तानं दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्शन उघड झालं आहे.