नवी दिल्ली : दिल्लीच्या श्रेष्ठ विहारसारख्या हायप्रोफाईल परिसरातून सकाळी स्कूल बसमधून एका मुलाचं अपहरण करण्यात आल्याचे माहिती आहे. २६ जानेवारीनिमित्त शहरात कडक बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने परिसरात एकद खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नर्सरीत शिकणारा हा मुलगा सकाळी साडे सात वाजता बहिणीसोबत शाळेसाठी निघाला होता. बसमध्ये जवळपास १५ ते २० विद्यार्थी होते. दोन बाईकस्वारांनी बस ड्रायव्हरवर गोळी झाडली आणि बसमधील एका मुलाला घेऊन फरार झाले.
अपहरणाची माहिती मिळतात परिसरात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांना अपघाताची माहिती मिळाली होती. ते धावतच घटनास्थळी पोहोचले तेव्हाच त्यांना अपहरणाची माहिती मिळाली. या बसमध्ये अपहरण झालेल्या मुलाची बहिणही होती. पण त्या व्यक्तींनी त्याच्या बहिणीला आणि इतर मुलांना काहीही केले नाही. केवळ त्याच मुलाला घेऊन ते फरार झाले. जखमी झालेल्या ड्रायव्हरला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
२६ जानेवारीनिमित्त १० देशांचे प्रतिनिधी भारतात येत आहेत. अशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीसहीत एनसीआरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही गुन्हेगारांना जराही भीती नाहीये. दिल्ली एका मुलाच्या अपहरणाच्या काही तासांपूर्वी मेरठमध्ये दिवसाढवळ्या आई-मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी परतापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिका-यासह ५ पोलीस कर्मचा-यांना सस्पेंड करण्यात आलं आहे.