नवी दिल्ली : दिल्लीतील दयाल सिंह इव्हिनिंग कॉलेजचे नाव 'वंदे मातरम', असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीने त्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी पारीत करून निर्णय घेतला. दरम्यान, हा निर्णय या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फारसा आवडला नाही. त्यामुळे मॉर्निंग आणि इव्हिनिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापणाच्या निर्णयास विरोध केला आहे.
दरम्यान, गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन अमिताभ सिन्हा यांनी सांगितले की, 'नोंटिफिकेशनमध्ये सांगितले आहे की, एग्जिक्युटिव्ह काऊन्सीलने दयाल सिंह ईव्हीनिंग कॉलेजला पूर्ण कॉलेजला पूर्ण कॉलेजचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या कॉलेजला आता आम्ही नवे आणि प्रेरणादाई नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही निर्णय घेतला आहे की, या कॉलेजचे बदललेले नाव 'वंदे मातरम' असे असायला हवे.'
अमिताभ सिन्हा यांनी सांगितले की, 'नाव बदलण्याचा निर्णय सर्वमान्यतेनेच पारीत करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला काही लोकांनी विरोध केला आहे. जो आपेक्षीत नाही. कारण, आज जो कोणी आहे तो, आपल्या आईमुळे आहे. जो आईला सन्मान देत नाही तो, जनावरच असू शकतो. माणूस नाही.'
विशेष असे की, व्यवस्थापणाने घेतलेल्या बैठकीत इव्हिनिंग कॉलेजचे नाव बदलण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे. मॉर्निंग कॉलेजचे प्राध्यापक प्रेमेंद्र कुमार परिहार यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये लोकशाही मुल्यांची कमतरता आहे. दोन्ही कॉलेजचे विभाजन केले जाईल. या विभाजनात कॉलेज मालमत्तेचेही विभाजन केले जाईल. याच मुद्द्यावरून पार्किंग आणि इतर साहित्य तसेच, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही मोठा संघर्ष सुरू झाला आहे.
मॉर्निंग कॉलेजचे एक प्रोफेसर विराज काफले यांनी सांगितले की, बैठकीत इतर मुद्द्यांवर चर्चा झाली नाही. दिल्ली युनिवर्सिटी विद्यार्थी संघाच्या गोंधळामुळे बैठक समाप्त करण्यात आली. विद्यार्थी संघटनेच्या काही विद्यार्त्यांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना बाहेर काढले.
दरम्यान, सध्या वातावरण गंभीर आहे.