23 ऑगस्ट रोजी सुरू होणार दिल्लीचा पहिला स्मॉग टॉवर,हवेतील प्रदुषण होणार कमी

 दिल्लीच्या लोकांना हवेच्या प्रदुषणापासून थोडा दिलासा मिळणार आहे.

Updated: Aug 20, 2021, 07:45 AM IST
23 ऑगस्ट रोजी सुरू होणार दिल्लीचा पहिला स्मॉग टॉवर,हवेतील प्रदुषण होणार कमी title=

दिल्ली : दिल्लीच्या लोकांना प्रदुषणापासून थोडा दिलासा मिळणार आहे. येथील पहिला स्मॉग टॉवर 23 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. हा टॉवर साधारण 1 किलोमीटर क्षेत्रातील हवा शुद्ध करेल. या स्मॉग टॉवरची क्षमता प्रतिसेकंद 1000 क्युबिक मीटर हवा शुद्ध करण्याची आहे.

दिल्लीला मिळणार पहिला स्मॉग टॉवरचे गिफ्ट

दिल्लीतील पहिले स्मॉग टॉवर 23 ऑगस्ट 2021 पासून दिल्लीचे मुंख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्धाटन होऊन चालू होणार आहे. याबाबत सांगितले जात आहे की, टॉवरमध्ये साधारण 1 किलोमीटरच्या रेडिअसमधील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी गुरूवारी (19 ऑगस्ट)रोजी या बहुचर्चित प्रोजेक्टच्या डेवलपमेंटचे निरिक्षण केले. मान्सूननंतर हे टॉवर आपल्या पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. या टॉवरच्या परिणामांच्या परिक्षणानंतर आणखी टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

2 वर्ष होणार पायलट स्टडी
दिल्ली कॅबिनेटने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पायलट प्रोजेक्टच्या स्वरूपात मंजूरी दिली होती. परंतु कोविड 19 महामारीमुळे या प्रोजेक्टला विलंब झाला. गोपाल रॉय यांनी म्हटले की, स्मॉग टॉवरच्या परिणामांचे परिक्षण करून सरकारला त्याचा  रिपोर्ट सादर केला जाईल. जर परिणाम सकारात्मक राहिले तर दिल्लीत आणखी टॉवर बसवले जातील.