Share Market : 1 एप्रिलपासून बंद होणार Demat Account, जाणून घ्या या मागील कारण

जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुमचे डीमॅट खाते किंवा ट्रेडिंग खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Updated: Mar 2, 2022, 10:04 PM IST
Share Market : 1 एप्रिलपासून बंद होणार Demat Account, जाणून घ्या या मागील कारण title=

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुमचे डीमॅट खाते किंवा ट्रेडिंग खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमचे केवायसी अजून अपडेट केले नसेल, तर ते 31 मार्चपर्यंत अपडेट करा. अन्यथा तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.

31 मार्चपर्यंत केवायसी अपडेट करा

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSD) आणि सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) यांनी जारी केलेल्या परिपत्रकात खातेधारकांना त्यांची 6 KYC माहिती द्यावी लागेल, असे म्हटले आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि उत्पन्न श्रेणी या सगळं द्यावं लागेल.

6 KYC तपशील अपडेट करणे आवश्यक

1 जून 2021 नंतर उघडलेल्या नवीन खात्यांसाठी सर्व 6 माहिती अनिवार्य करण्यात आली होती. ज्यामुळे त्यांना हे करण्याची गरज लागणार नाही. परंतु त्यापूर्वी ओपन केलेल्या खात्यांसाठी, बाजार नियामक SEBI ने सर्व 6 KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला ते अपडेट करावं लागेल.

PAN व्हेरिफाय करा

या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सिक्युरिटीज मार्केटमधील व्यवहारांसाठी ग्राहकांच्या वतीने पॅन सादर करण्याची आवश्यकतेमध्ये सुट राहील, परंतु गुंतवणूकदारांना आयकर वेबसाइटला भेट देऊन पॅन कार्ड व्हिरिफाय करावे लागेल. त्यात जर तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुमचा पॅन कार्ड वैध मानला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला देखील करावं लागेल.

ही माहिती अपडेट करा

सर्व खातेदारांना स्वतंत्र मोबाईल क्रमांक आणि ई-मेल एड्रेस द्यावा लागेल. परंतु जर तशीच काही समस्या असल्याते तो व्यक्ती आपल्या जवळील व्यक्तीचा मोबाईलनंबर आणि ई-मेल एड्रेस देऊ शकतो. जवळील व्यक्ती म्हणजे जोडीदार, अवलंबून असलेले पालक किंवा मुले.

कौटुंबिक माहिती अपडेट करा

जर एकच मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी एकापेक्षा जास्त डिमॅट खात्यांमध्ये आढळला आणि कुटुंबाची माहिती देखील अपडेट केली नसेल, तर अशा डिमॅट खातेधारकांना 15 दिवसांची नोटीस देऊन त्यांना मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी बदलण्याचा रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल. जर ते तसे करण्यात अयशस्वी झाले, तर अशी खाती नॉन-कंप्लायंट्स केली जातील.