नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर

नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर  विरोधकांकडून टीका होत असताना आता  स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 4, 2017, 12:35 PM IST
नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर title=

नवी दिल्ली : नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना आता स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे. माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी घरचा आहेर दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची भर पडली आहे. त्यांनी मोदींवर तोफ डागली आहे. 

नोटाबंदीवरुन केंद्र सरकारवर माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी तोफ डागलेय. नोटाबंदी ही देशातील सर्वात मोठी मनी लॉन्ड्रिंग योजना होती, अशा कठोर शब्दांमध्ये शौरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी होता, असे काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. याचा दाखला घेत शौरी यांनी जोरदार टोला हाणला. आत्महत्येचा निर्णयदेखील धाडसीच असतो, असे ते म्हणालेत.

दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी  गेल्या आठवड्यात नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन मोदी सरकारला टीकेच लक्ष्य केले होते. मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा  चलनातून बाद झाल्या. काळा पैशाला पायबंद घालण्यासाठी हे पाऊल उचल्याचे म्हटले. मात्र, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पोलखोल केल्याने मोदी सरकारच्या अडचणीत वाढल्या. त्यातच स्वपक्षीय नेते टीका करत असल्याने जोरदार चर्चा आहे.