मुंबई : सध्या सर्वत्र लग्न धुमधड्यात सुरु आहेत. अशात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्ना डान्स नसेल, तर त्या लग्नाला काही धमाल नसते. लग्नात वऱ्हाडी तुफान डान्स करतात. शिवाय वधू-वराच्या डान्सकडे देखील पाहुण्यांचं लक्ष असते. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये वधू-वर नाही, तर नवरी चक्क दीरासोबत थिरकताना दिसत आहे.
दीर आणि वहिनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक महिला बाहेर उभ्या आहेत. तेव्हा वहिनी आणि दीराचा डान्स पाहून जवलेले सगळे थक्क झाले.
वहिनी आणि दीराचा डान्स रंगल्यानंतर सासूला राग आला आणि सूनेला तिने बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. पण सून काही ऐकेना. एवढंच नाही, तर शेजारी असलेल्या महिलांनी देखील नव्या नवरीला नाचण्यापासून रोखलं नाही. सध्या दीर आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे