Crime News : बांसवाडा जिल्ह्यातील घाटोल पोलीस ठाण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुलत भावानेच भावाची हत्या केल्याचा प्रकार राजस्थानात घडला. हत्येचा आरोप असलेल्या मृताच्या चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून हा खून केल्याची कबुली चुलत भावाने दिली आहे. त्यानंतर राजस्थानात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
आरोपी दिराने मृताच्या पहिल्या पत्नीशी अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली दिली. हत्येनंतर आरोपी अंत्यविधीला उपस्थित होता. मृताच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर शवविच्छेदन केलं गेलं. पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.
महिलेच्या पतीने आणखी दोन महिलांसोबत लग्न केलं होतं. नवरा अहमदाबाद येथं मजुरीचं काम करायचा. दोघांमध्ये भांडण झाल्याने नवरा 6 ऑक्टोबर रोजी अहमदाबादहून घरी आला होता. घटनेच्यावेळी बायको घराबाहेर होती. त्यानंतर तिला आपल्या नवऱ्याची हत्या झाल्याची माहिती मिळाली. तिने घटनास्थळ गाठून पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली.
नवरा आणि आरोपी चुलत भाऊ या दोघांचे चांगले संबंध होते. पतीने दुसरं लग्न केल्याने आणि दुसऱ्या पत्नीसोबत बाहेर राहिल्यानं दिराने भावाच्या पत्नीशी संबंध ठेवले. हत्येपूर्वी दोघांनी दिराच्या घरी दारू पार्टी आयोजित केली होती. अवैध संबंध आणि जमिनीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर केशवने नाथूच्या डोक्यावर खाटेने वार केले आणि तेथून निघून गेला.
पतीला दारूचे व्यसन असल्यानं पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केलं, डोक्यात जड वस्तूने वार केल्यानं मृत्यू झाल्याचं तक्रारीत समोर आलं होतं. त्यावर पोलिसांनी तपास पथक तयार करून आरोपी केशवलालला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
आणखी वाचा - दिराने वहिनीचा केला 'तो' फोटो शेअर, लिहिलं 'I Miss U Jaan', नंतर जे काही झालं ते...