मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाची (corona vaccination) मोहीम सुरू असल्यानं आता वैमानिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नागरी उड्डाण महासंचलनालयाने (DGCA) हे नियम ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहेत.
— DGCA (@DGCAIndia) March 9, 2021
वैमानिक आणि केबिन क्रू (Pilots) अशा दोघांसाठीही ही नियमावली लागू असेल. या नियमांनुसार कोरोना लसीचा डोस घेतल्याच्या 48 तासांपर्यंत वैमानिकांना आणि केबिन क्रूला विमानात बसू शकत नाहीत.
वैमानिक किंवा केबिन क्रूला लसीचे दोन्ही डोस घेताना हे नियम लागू असणार आहेत. जेव्हा त्यांना लसीचा डोस दिला जाईल, तेव्ही नियमाप्रमाणे 30 मिनिटं ते निरीक्षणाखाली असतील. त्यांना कोणते दुष्परिणाम जाणवतायत का हे पाहिलं जाईल. आणि पुढचे 48 तास त्यांना विमानातील आपलं कर्तव्य बजावण्यापासून मनाई असेल.
लसीचा डोस घेतल्याच्या 48 तासांनंतर वैमानिक किंवा केबिन क्रूला कोणतेही दुष्परिणाम जाणवत नसतील, तर त्यांना विमानात बसण्याची परवानगी दिली जाईल.
लसीचा डोस दिल्याच्या 48 तासांनंतर जर कोणता दुष्परिणाम जाणवत असेल, त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. त्यानंतरच त्यांना विमान चालवण्याची किंवा विमानातील आपलं कर्तव्य निभावण्याची अनुमती मिळेल.
जर लसीचा डोस घेतल्याचे दुष्परिणाम हे 14 दिवसांपेक्षाही जास्त काळ राहिले तर एक अशा वैज्ञानिक आणि केबिन क्रूसाठी एक विशेष वैद्यकीय चाचणी केली जाईल.