मुंबई : एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे महागाईने डोके वर काढले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. तसेच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत आहे. त्याचवेळी तेड आणि डाळी यांच्याही किमतीत भर पडत आहे. त्यामुळे महागाईत अधिक भर पडत आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तर डिझेल नव्वदीकडे झुकले आहे. आता पुन्हा पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनधारकांना काळजीत भर पडली आहे. (Petrol prices )
कच्च्या तेलाचे दर वाढल्याने आता पेट्रोलचे दर वाढणार असल्याचे संकेत आहे. नोव्हेंबरपासून पेट्रोलचे दर लिटरमागे 10 रुपयांनी, तर डिझेलचे दर 11 रुपयांनी वाढले आहेत. देशाच्या काही शहरांत पेट्रोल 100 रुपयांच्यावर गेले आहे. मागील नऊ दिवसांपासून तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविलेले नाहीत. मात्र कच्चा तेलाचे दर वाढल्याने कंपन्या दरवाढ करणार हे निश्चित आहे.
शंभरीच्या उंबरठ्यावर उभे असलेले पेट्रोल लवकरच खरोखर शंभरी पार करणार, अशी शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमालीचे वाढलेत. कच्चा तेलाचे दर प्रती बॅरल 70 डॉलरच्या वर गेलेत. सोमवारी ब्रेंट क्रूडचे दर 1.14 डॉलरने वाढून 70.47 डॉलर प्रतिबॅरल झाले. त्याआधी शुक्रवारी ते 2.62 डॉलरने वाढले होते.
सौदीतील रास तनुरा तेल निर्यात सुविधेवर हाऊथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला. एक क्षेपणास्त्र डागले. जगातील सर्वांत मोठ्या तेल निर्यात सुविधेचे हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नसले तरी सौदी अरेबियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या सुरक्षेबाबत यामुळे चिंता निर्माण झाली आहे.
त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. नोव्हेंबरपासून पेट्रोलचे दर लिटरमागे 10 रुपयांनी, तर डिझेलचे दर 11रुपयांनी वाढले आहेत. भारताच्या काही शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले आहे. मागील नऊ दिवसांपासून तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविलेले नाहीत. मात्र कच्चा तेलाचे दर वाढल्याने कंपन्या दरवाढ करणार हे निश्चित आहे.