डिंपल यादव यापुढे नाहीत लढवणार निवडणूक

उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यापूढे निवडणुक लढवणार नाहीत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 24, 2017, 05:50 PM IST
डिंपल यादव यापुढे नाहीत लढवणार निवडणूक  title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यापूढे निवडणुक लढवणार नाहीत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच याबाबात घोषणा केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अखिलेश यांनी रायपूर येथे रविवारी ही माहिती दिली. अखिलेश यादव यांनी यादव परिवारातील गृहकलहावर खेळलेला हा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे. 

डिंपल यादव या उत्तर प्रदेशमधील प्रभावी राजकारणी घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलायम सिंह यांदव यांच्या सुनबाई आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. भारतीय राजकारणात घराणेशाही हा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो. त्यात देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात यादव कुटूंबाचा मोठा बोलबाला आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा मोठा अवकाश यादव कुटूंबाने व्यापला आहे. त्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता उत्तर प्रदेशातील यादव कुटूंबावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपासून समाजवादी परिवार अशी ओळख असलेल्या मुलायमसिंह यादव कुटुंबियांमध्ये यादवी माजली आहे. या गृहकलहाचा परिणाम पक्षातील फाटाफूटीवर झाला. यातूनच अखिलेश यादव यांचा एक गट तर, दुसऱ्या बाजूला. मुलायमसिंह आणि शिवपाल यादव यांचा गट.