मुंबई : दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वांकडे आकाशकंदील लावण्यात आले असतील. येत्या बुधवारी भाऊ आणि बहिणीसाठी मोठा सण आहे तो म्हणजे भाऊबीज. मात्र यामध्ये सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे भावाला किंवा बहिणीला गिफ्ट काय द्यायचं. इतकंच नाही तर नातेवाईकांनाही अनेकदा गिफ्ट द्यावं लागतं. जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. अगदी कमी बजेटमध्ये गिफ्ट काय देऊ शकतो हे जाणून घेऊया.
जर तुम्ही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर टीलाइट कँन्डल स्टँड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. 500 रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही कोणत्याही मार्केटमधून ते खरेदी करू शकता. केवळ बहिणीलाच नाही तर मित्रांना आणि नातेवाईकांना ही भेट नक्कीच आवडेल.
जर तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने मित्र किंवा नातेवाईकांना गिफ्ट देत असाल तर फेंगशिई, वास्तू संबंधित गोष्टी हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. याशिवाय तुम्ही मां लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती गिफ्ट देऊ शकता.
दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्व लोकं त्यांच्या घराची साफसफाई करतात. अशात घरामध्ये सुगंध दरवळावा म्हणून नातेवाईकांना अरोमा डिफ्यूजर गिफ्ट करू शकता. हे तुमच्या खिशालाही परवडण्यासारखं आहे आणि नातेवाईकांनाही आवडेल.
दिवाळीच्या दिवसांत घराघरात दिवे लावले जातात. अशात तुम्ही नातेवाईकांना त्यांचं घर सजवण्यासाठी विविध दिवे आणि कँडल गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट तुमच्या बजेटमध्ये बसण्यासारखं आहे.
हे एक असं गिफ्ट आहे जे प्रत्येकाला आवडण्यासारखं आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही नातेवाईकांना इंडोर प्लांट्स गिफ्ट करू शकता. हे सहजरित्या तुमच्या खिशाला परवडण्यासारखं आहे.