चलनातील 2 आणि 10 रुपयांच्या नाण्यावरील 'या' चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या माहिती

हे चिन्ह नाण्यांवरती का छपलं गेलं आहे, यामागील कहाणी फार कमी लोकांना माहिती असावी.

Updated: Feb 15, 2022, 06:38 PM IST
चलनातील 2 आणि 10 रुपयांच्या नाण्यावरील 'या' चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या माहिती title=

मुंबई : स्वातंत्र्यानंतर भारताने आपली स्वत:चे चलन बनवण्यासाठी सुरूवात केली. यानंतर अनेक नाणी आणि नोटा आपल्या चलनात आल्या आणि गेल्या, ज्यांच्यावर वेगवगेळ्या प्रकारचे डिझाईन केलेले असते. त्याचप्रमाणे आपण वापरत असलेली एक, दोन आणि पाच रुपयांची नाणी अजूनही चलनात आहेत, परंतु त्यांच्या मुळ डिझाइनमध्ये अनेक बदल झाले, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाणी पाहायला मिळतात.

त्यात तुम्ही दोन रुपये आणि 10 रुपयांच्या नाण्यावरती एक सारखं डिझाइन पाहिलं असेल, पण ते चिन्ह नाण्यांवरती का छपलं गेलं आहे, यामागील कहाणी फार कमी लोकांना माहिती असावी.

तर आज आम्ही तुम्हाला यावरीन असलेल्या या चिन्हाबद्दल काही महत्वाची माहिती सांगणार आहोत.

हे 2 रुपयाचे नाणे का खास आहे?

एपिक चॅनलच्या एका डॉक्युमेंट्रीनुसार, 2006 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन रुपयांचे नाणे बनवले होते. हे नाणे आधीच्या दोन रुपयांच्या नाण्यांपेक्षा खूपच वेगळे होते. या नाण्याच्या पाठीमागे काही रेषा एकमेकांना छेदत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. या कटिंग लाईन्स हे या नाण्याचे खास वैशिष्ट्य होते.

यासोबतच त्यात चार ठिपकेही दिसत होते. 10 रुपयांच्या नाण्यांच्या मागे देखील तुम्ही अशा प्रकारचे चिन्ह पाहिले असेल. 

परंतु यामागचे कारण सांगत आरबीआयने सांगितले की, चार ओळी चार वेगवेगळ्या लोक एक असल्याची भावना दर्शवतात. म्हणजे ते आपली राष्ट्रीय एकात्मता दाखवतात.

आता ही चिन्ह असलेलं नाणं का बनवले जात नाही?

खरेतर या डिझाईनवरून एकदा वाद झाला होता. ज्यामुळे आता या डिझाईनची नाणी बाजारात येत नाहीत. यावर अनेकांनी आक्षेप घेतला की हे नाणे ख्रिश्चन धर्माचा क्रॉस दाखवते. त्यानंतर ही नाणी थांबली गेली. 10 रुपयांच्या नाण्यामागे देखील हीच कहाणी आहे. 10 रुपयांचे हे नाणं जर तुम्ही नीट पाहिललं तर तुम्हाला ते दोन वेगवेगळ्या धातूंनी बनवेलं दिसेल.

नाणी कधी सुरू झाली?

1947 ते 1950 पर्यंत भारत सरकारने फक्त ब्रिटिश भारतीय नाणी वापरली. वास्तविक, पहिली नाणी तयार करण्यासाठी भारतात तीन टांकसाळे होती. फार कमी लोकांना माहीत असेल की, भारतात चलनात असलेली नाणी दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरातही बनवली जात होती.