लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलाला प्रॉपर्टीत हक्क मिळतो का? जाणून घ्या

लिव-इन रिलेशनशिपचे नियम आणि कायदे बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीत अडचणी येतात.

Updated: Jun 15, 2022, 10:32 PM IST
लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलाला प्रॉपर्टीत हक्क मिळतो का? जाणून घ्या title=

मुंबई : सध्या तरुण मंडळी लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहात आहे, हा एक प्रकारचा ट्रेंडच झाला आहे. परंतु याचे नियम आणि कायदे बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीत अडचणी येतात किंवा मग मोठा पेच उभा राहातो. जसं की बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की, लिव्ह-इनमध्ये असताना जर त्यांना बाळ झालं तर? त्या बाळावर कोणाचा हक्क असतो? किंवा त्या बाळाला वडिलांच्या प्रॉप्रटीत हक्कं मिळेल का? इत्यादी. यावर तोडगा काढत केरळच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, लग्न न करता दीर्घकाळ एकत्र राहणाऱ्या जोडप्याच्या मुलांनाही कौटुंबिक मालमत्तेत वाटा मिळू शकतो.

सर्वोच्च न्यायालय हे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर विचार करत होते. ज्यामध्ये फिर्यादींच्या पालकांनी लग्नाला उपस्थित न राहिल्याचा दाखला देत कथित बेकायदेशीर मुलाचा मालमत्तेच्या वाट्याचा दावा नाकारला होता.

तथापि, हे जोडपे बऱ्याच काळापासून एकत्र राहत असल्याचे निरीक्षण करून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे नाते लग्नासारखे असल्याचे सांगितले.

दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा स्थितीत मूल त्या दोघांचे आहे हे सिद्ध झाले, तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे असे सांगितले.

खंडपीठाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, "जर पुरूष आणि स्त्री दीर्घकाळ पती-पत्नी म्हणून एकत्र राहत असतील, तर ते विवाह मानले जाईल, हे प्रस्थापित आहे." पुरावा कायद्याच्या कलम 114 अन्वये असा निष्कर्ष काढता येतो, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

त्यात असेही म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाने रेकॉर्डवरील पुराव्यांच्या तपासणीवर असे निरीक्षण केले होते की, दामोदरन आणि चिरुथाकुट्टी हे जोडपे दीर्घकाळ एकत्र राहत होते. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, दामोदरनने 1940 मध्ये चिरुथाकुट्टीशी लग्न केले. तथापि, त्यांच्या लग्नाचा कोणताही थेट पुरावा नाही. ज्यानंतर त्यांच्या मुलाचा जन्म 1942 साली झाला.

परंतु आता सगळी कागदपत्र आणि पुरावे पाहिल्यानंतर कोर्टाने या मुलाला त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळवून दिला आहे.