Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं....Watch Video

Dr Ambedkar London Home Inside Video: डॉ. आंबेडकर १९२०-२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत होते. पाहा बाबासाहेबांच घर आतून कसं दिसतं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 7, 2023, 11:29 AM IST
Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं....Watch Video  title=

Dr Ambedkar London Home Inside Video: देशाच्या संविधानाचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांचे लंडनमध्ये घर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मध्ये राहून शिक्षण घेतलं. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना 1921-22 मध्ये 10 किंग हेन्री मध्ये वास्तव्यास होते. हेच घर आतून कसं दिसतं हे Focusedindian म्हणजे डिजिटल क्रिएटर करण सोनावणेने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

संग्रहालयाच्या मुख्य मजल्यावर निवडक कृष्णधवल फोटोज आहेत, आंबेडकरांचे प्रसिद्ध कोट्स आहेत. एका खोलीमध्ये त्यांचे काही साहित्य आहे याशिवाय एका भिंतीवर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे मोठे चित्र आहे.  घराचा व्हिडीओ Focusedindian शेअर केले आहे.

भारताचा पाया... माझा भिमराया...या गाण्यासह हा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. 

6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला. या दिवशी मुंबईत चैत्यभूमीवर जनसमुदाय लोटला होता. बाबासाहेबांच्या विचारांनी भारावलेले तरुण येथे उपस्थित होते. भारतभर हा दिवस साजरा केला जातो.

(हे वाचा - Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार)

बाबासाहेबांची महत्त्वाची माहिती 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील काही महान विद्वानांपैकी एक होते. बाबासाहेबांनी तब्बल 32 विषयांत पदवी घेतली होती. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून (Elphinstone College) बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एमए करण्यासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (Columbia University) गेले. याच विद्यापीठामधून त्यांनी पीएचडीही केली. त्यानंतर बाबासाहेबांनी 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएससी, डीएससी (Doctor of Science) केले. बॅरिस्टर-एट-लॉ (A barrister at Law) म्हणून पदवी प्राप्त केली. त्याकाळी एल्फिन्स्टन कॉलेजमधून शिक्षण घेणारे ते एकमेव दलित विद्यार्थी होते.

(हे पण वाचा - Mahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य)

आंबेडकरांना पुस्तके वाचण्याची भरपूर आवड होती. त्यांच्याकडे पुस्तकांचा मोठा आणि उत्कृष्ट संग्रह होता. अमेरिकन पत्रकार आणि लेखक जॉन गुंथरने (John Gunther) इनसाइड एशियामध्ये (Inside Asia) लिहिल्याप्रमाने १९३८ साली आंबेडकरांकडे ८००० (आठ हजार) पुस्तके होती. त्यांचा मृत्यूसमयी हा आकडा तब्बल ३५ हजारांवर वर पोहोचला होता.