मुंबई : जर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा किंवा रिन्यू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केले आहेत. ज्यामध्ये नव्या नियमांचा फायदा सर्वसामान्यांना नक्की मिळणार आहे. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या सुधारित नियमानुसार, आता तुम्हाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून नवीन नियम लागू केले जातील.
नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे.
तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये DL साठी नोंदणी करू शकता. इथून ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथून परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना शाळा प्रमाणपत्र देईल. या प्रमाणपत्राच्या आधारे तुमचा DL तयार केला जाईल.
ड्रायव्हिंग लायसन्स (DL) शिकवण्याचा अभ्यासक्रम मंत्रालयाने तयार केला आहे. हे सिद्धांत आणि व्यावहारिक अशा दोन भागात विभागलेले आहे. लाइट मोटर व्हेईकल (LMV) या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडे आहे, जो 29 तास चालेल.
तर प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींवर प्रॅक्टिकलसाठी 21 तास द्यावे लागतील. उर्वरित 8 तास तुम्हाला थिअरी शिकवली जाईल.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने प्रशिक्षण केंद्रांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही निश्चित केल्या आहेत. तुमच्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे.
1. दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जागा. अवजड प्रवासी/माल वाहने किंवा ट्रेलरसाठी प्रशिक्षण केंद्राजवळ दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.
2. प्रशिक्षकासाठी किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्याला किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
3. ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम सिद्धांत आणि व्यावहारिक 2 भागांमध्ये विभागलेला आहे.
4. प्रशिक्षण केंद्रात बायोमेट्रिक यंत्रणा असणे आवश्यक आहे.
5. मध्यम आणि अवजड वाहन मोटार वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तासांचा आहे. थिअरी क्लासचे 8 तास आणि प्रॅक्टिकलचे 31 तास असतील.