हेल्मेटवर कॅमेरा लावून गाडी चालवताय? मग थांबा आधी ही माहिती वाचा नाहीतर होईल नुकसान

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उपस्थीत झाला असेल की असं का? हेल्मेटवर कॅमेरा लावण्यासाठी कशासाठी बंदी घातली गेली असावी? चला तर याचं कारण समजून घेऊ

Updated: Aug 11, 2022, 07:29 PM IST
हेल्मेटवर कॅमेरा लावून गाडी चालवताय? मग थांबा आधी ही माहिती वाचा नाहीतर होईल नुकसान title=

मुंबई : तुम्ही बऱ्याच अशा लोकांना पाहिलं असेल की, जे आपल्या हेल्मेटवरती कॅमेरा लावून फिरतात. बऱ्याचदा अशी लोकं युट्यूबर किंवा ट्रॅवल ब्लॉगर असतात. जे आपला प्रवास कॅमेरात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. हे आता सर्वत्र कॉमन झालं आहे. परंतु असं असलं तरी भारतातील या भागात मात्र आता हेल्मेटवर कॅमेरा लावून तुम्ही फिरताना दिसलात, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

रिपोर्ट्सनुसार, केरळ मोटार वाहन विभाग हेल्मेटवर कॅमेरा चालवण्याचा नियम बनवत आहे. त्यामुळे आता हा नवीन नियम लागू झाल्यानंतर जर तुमच्या हेल्मेटवर कॅमेरा आढळला तर तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर दुचाकीस्वाराचा ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. (Kerala Motor Vehicle Department To Ban Helmet Cameras)

त्यामुळे जर भविष्यात केरळ मोटार वाहन विभागाने हा नियम लागू केला आणि तुम्ही फिरण्यासाठी म्हणून केरळला गेलात तर हेल्मेटवर कॅमेरा लावण्यापूर्वी थोडा विचार करा... नाहीतर तुमचं नुकसान झालंच म्हणून समजा.

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उपस्थीत झाला असेल की असं का? हेल्मेटवर कॅमेरा लावण्यासाठी कशासाठी बंदी घातली गेली असावी? चला तर याचं कारण समजून घेऊ

हेल्मेट कॅमेऱ्यावर बंदी का?

मागील वर्षी देखील केरळ मोटार वाहन विभागाने हा निर्णय घेतला होता, त्यावेळी कारण देत त्यांनी सार्वजनिक रस्त्यांवरील रेसिंग, स्टंटबाजी आणि इतर समाजविघातक कृत्ये थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. मात्र यावेळी कारण पूर्णपणे वेगळे आहे. यावेळी हेल्मेटवर कॅमेरा बंदी घातल्याने हेल्मेटच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचे वाहन विभागाचे म्हणणे आहे.

जर अशावेळी अपघात झाला तर हेल्मेटची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे रायडरला धोका वाढू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.

केरळच्या मोटार वाहन विभागाने हेल्मेटवर कॅमेऱ्यांवर बंदी घालण्यामागे प्रसिद्ध फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकल शूमाकरचे उदाहरण दिले आहे. स्कीइंग अपघातादरम्यान मायकेल शूमाकरच्या दुखापतीचे मुख्य कारण म्हणून हेल्मेट कॅमेऱ्यांना दोष देण्यात आला. त्याच वेळी, बीबीसी सारख्या काही नामांकित कंपन्यांचा दावा आहे की, हेल्मेटच्या कॅमेऱ्याला अपघात झाल्यास तो देखीत थोडासा दबाव सहन करतो, त्यामुळे हेल्मेटवरील कॅमेरा सुरक्षित आहे. (Kerala Motor Vehicle Department To Ban Helmet Cameras)

FIA कडून घातली बंदी

फेडरेशन इंटरनॅशनल डीऑटोमोबाईल (FIA), मोटरस्पोर्टच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय संस्थांपैकी एक अशा या संस्थेने देखील हेल्मेटवर कॅमेरे वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही तुम्हाला दुचाकी चालवताना कॅमेरा वापरायचा असेल, तर तुम्ही मोटरसायकलवर कॅमेरा बसवू शकता. त्याच वेळी, काही रायडर्स राइडिंग जॅकेटवर कॅमेरा स्थापित करण्याची शिफारस करतात.

हा नियम केरळमध्ये लागू करण्याचा सध्या विचार सुरु आहे. परंतु भारतातील इतर भागांमधून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.