दगाबाज बॉयफ्रेंडच्या दारासमोर गर्लफ्रेंडचा "इमोशनल अत्याचार"

ब्रेकअप झालेली व्यक्ती काहीही करू शकते....

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 5, 2018, 06:29 PM IST
दगाबाज बॉयफ्रेंडच्या दारासमोर गर्लफ्रेंडचा "इमोशनल अत्याचार" title=

मुंबई : ब्रेकअप झालेली व्यक्ती काहीही करू शकते....

याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आणि आपल्याला माहितच आहे 'प्रेमात आणि युद्धात सगळं माफ आहे'. मग अशा हृदय तुटलेल्या लोकांनी काहीही केलं तरी त्या गोष्टीकडे अगदी सहानभुतीने पाहिलं जातं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

खबर एनडीटीव्ही डॉट कॉम या बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार दारू प्यायलेल्या मुलीने या व्हिडिओत एका बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे. तेरे इश्क मे नचेगा सारख्या अनेक गाण्यांवर या मुलीने डान्स केला आहे. 

आपल्या बॉयफ्रेंडने दगा दिल्यामुळे या मुलीने गाडीत डी जे लावून चक्का डान्स केला आहे. या मुलीचे आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आताचा हा व्हिडिओ पतौडीतला आहे जेथे ही मुलगी डान्स करत आहे. महत्वाचं म्हणजे या मुलीने फसवलेल्या बॉयफ्रेंडच्या घराबाहेरच डी जे लावून डान्स केला आहे.