पहिल्याच दिवशी मेट्रो फेल, लोकांना उतरवले खाली

मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली लखनऊ मेट्रो पहिल्याच दिवशी नापास झाली. मंगळवारी उद्घाटन झाल्यावर ही मेट्रो बुधवारपासून जनतेच्या सेवेत रूजू करण्यात आली. मात्र, प्रवासाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत बिघाड झाला आणि प्रवाशांना चक्क खाली उतरावे लागले.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 6, 2017, 04:31 PM IST
पहिल्याच दिवशी मेट्रो फेल, लोकांना उतरवले खाली title=

लखनऊ  : मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली लखनऊ मेट्रो पहिल्याच दिवशी नापास झाली. मंगळवारी उद्घाटन झाल्यावर ही मेट्रो बुधवारपासून जनतेच्या सेवेत रूजू करण्यात आली. मात्र, प्रवासाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत बिघाड झाला आणि प्रवाशांना चक्क खाली उतरावे लागले.

मेट्रो प्रवासावेळी दुर्गापुरी आणि मवईयादरम्यान मेट्रोत तांत्रीक बिघाड झाला. ज्यामुळे प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरावे लागले. आलमबागजवळ साधारण २० मिनीटे मेट्रो ठप्प झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेट्रोला मंगळवारीच हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर बुधवारपासून ही मेट्रो जनतेच्या सेवेत रूजू झाली होती. आज (बुधवार) मेट्रोचा आणि उत्तर प्रदेशमधील नागरिकांचा मेट्रोप्रवासाचा पहिलाच दिवस होता.

दरम्यान, उत्तर प्रदेशची मेट्रो हा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यापासून मेट्रोच्या पूर्ण प्रक्रियेत अखिलेश सहभागी होते. मात्र, दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या. त्यात अखिलेश यांचे सरकार गेले आणि भाजप सरकारच्या रूपात योगी सत्तेत आले. त्यामुळे योगी सरकारच्या कार्यकाळात मेट्रोचे उद्घाटन झाले.