दसऱ्याच्या मुहुर्तावर या 10 स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; एका वर्षात दुप्पट तिप्पट परताव्याची क्षमता

शेअर बाजाराच्या रॅलीमध्ये अनेक लोकांनी कमाईची संधी गमावली असेल तर, अजुनही गुंतवणूकीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

Updated: Oct 14, 2021, 04:01 PM IST
दसऱ्याच्या मुहुर्तावर या 10 स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; एका वर्षात दुप्पट तिप्पट परताव्याची क्षमता

मुंबई : शेअर बाजार आपल्या ऐतिहासिक उंचीवर आहे.  सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही रेकॉर्ड स्तरावर आहेत. बाजारात तेजीची रॅले वर्षभरापासून सुरू आहे. परंतु या रॅलीमध्ये अनेक लोकांनी कमाईची संधी गमावली असेल तर, अजुनही गुंतवणूकीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

आम्ही तुम्हाला मार्केट एक्स्पर्ट्स संदिप जैन यांनी सूचवलेले काही 10 शेअर्स सांगणार आहोत. या शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही 9 ते 12 महिन्यात चांगला रिटर्न मिळवू शकता. पुढे दिलेले शेअर्स तीन कॅटेगिरीमध्ये आहेत.

हाय रिस्क हाय रिटर्न
सनफ्लॅग आयरन
टार्गेट 97 रुपये
 ही मेटल सेक्टरमधील शानदार कंपनी आहे. चांगल्या वॅल्युएशनवर ट्रेड करीत आहे. 
 
 TD POWER SYSTEM
 टार्गेट 390 रुपये
 ही पावर सेक्टरमधील चांगली ग्रोथ असणारी कंपनी आहे. मागील 3 वर्षात नफ्यात 68 टक्के CAGR ने ग्रोथ राहिली आहे. हा शेअर येणाऱ्या दिवसांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो
 
 Bank Of Baroda
 टार्गेट 105 रुपये
 पीएसयू बॅंक स्टॉक Bank Of Baroda च्या शेअरमध्ये सध्या जास्त तेजी दिसून आलेली नाही. बँकेचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये चांगला मोमेंटम बनलेला आहे.
 
 मॉडरेट इन्वेस्टर्ससाठी
 Nestle
 टार्गेट 21750 रुपये
 ही एफएमसीजी सेक्टरमधील मजबूत कंपनी आहे. कंपनीचे मॅगी आणि किटकॅट सारखे लोकप्रिय प्रोडक्ट आहेत.  कंपनीने आपले कर्ज कमी केले आहे.  
 
 HIL
 टार्गेट 5930 रुपये
 ही कंपनी बिल्डिंग मटेरिअल बनवते. ही सीके बिरला ग्रुपची कंपनी आहे. स्टॉकचे वॅल्युएशन चांगले आहे. कंपनीनेच डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगले आहे. 
 
 Hawkins Cooker
 टार्गेट 6950 रुपये
 
 कमी रिस्क शानदार रिटर्न्स
 VST Industries
 टार्गेट 4130 रुपये
 कंपनीचा डिविडंड यिल्ड 3.5 टक्के आहे. आरके दमानी सारख्या दिग्गजांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. थोडी घसरण झाल्यास हा शेअर खरेदी करू शकता.
 
 Akzo Nobel India
टार्गेट : 2490 रुपये
ही एक एमएनसी पेंट कंपनी आहे. रिअल इस्टेट सेक्टरमध्ये होण्याऱ्या वाढीमध्ये हा शेअर तेजी नोंदवू शकतो.

FDC Ltd
टार्गेट : 410 रुपये
ही एक फार्मा कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉल, माइक्रोडर्म सारखे प्रसिद्ध ब्रॅंडची निर्मिती करते. कंपनी ओआरएसची मोठी मॅन्युफॅक्चरर आहे. यामध्ये डाऊनसाईड रिस्क कमी आहे.

HDFC ltd
टार्गेट 3150 रुपये
फायनान्शिएल सेक्टरमधील मजबूत कंपनी आहे. हा एक चांगला क्वॉलिटी स्टॉक आहे. ज्यामध्ये सलग ग्रोथ दिसून येत आहे.