Delhi Earthquake : एका डच संशोधक आणि संस्थेकडून पाकिस्तान आणि नजीकच्या भागातील भूगर्भातील हालचाली पाहता प्रचंड तीव्रतेच्या भूकंपाचा इशारा देण्यात आला होता. ज्यानंतर भारतातही त्याचे काही परिणाम दिसून येणार का अशीच चिंता अनेकांनी व्यक्त केली. इथं ही भविष्यवाणी होत असतानाच तिथं भारतासह नेपाळमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती समोर आली.
फक्त दिल्लीच नव्हे, तर जम्मू काश्मीर आणि अफगाणिस्तान, पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमा भागांतही भूकंपाचे हादरे जाणवले. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.8 ते 6.7 रिश्टर स्केल इतक्या प्रमाणात मोजला गेला. उत्तर भारतामध्येही भूकंपाचे हादरे जाणवल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
#WATCH | Earthquake tremors felt across Delhi-NCR. Visuals from Noida Sector 75 in Uttar Pradesh. pic.twitter.com/dABzrVoyVw
— ANI (@ANI) October 3, 2023
Earthquake of Magnitude:6.2, Occurred on 03-10-2023, 14:51:04 IST, Lat: 29.39 & Long: 81.23, Depth: 5 Km ,Location:Nepal for more information Download the BhooKamp App https://t.co/rBpZF2ctJG @ndmaindia @KirenRijiju @Indiametdept @Dr_Mishra1966 @Ravi_MoES pic.twitter.com/tOduckF0B9
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) October 3, 2023
दिल्लीसह उत्तर भारतात आलेल्या भूकंपाची तीव्रता इतकी होती की कार्यालयांमधील माणसांनी धाव घेत रस्त्यावर गर्दी केली. प्राथमिक माहितीनुसार नेपाळमध्येच या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अर्ध्या तासामध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं म्हटलं गेलं. दुपारी साधारण 2 वाजून 25 मिनिटं आणि त्यानंतर 2 वाजून 51 मिनिटांनी हे भूकंप आले.
सोलर सिस्टम ज्योमेट्री सर्वे (एसएसजीईओएस)नं वर्तवलेल्या अंदाजानुसार पाकिस्तान आणि सीमाभागालगतच असणाऱ्या भूगर्भीय हालचाली एका संकटाची चाहूल देत असून, येत्या काही तासांत त्यामुळं या भागांना भूकंपाचा संभाव्य धोका असल्याचं सांगण्यात आलं. शिवाय त्सुनामीचाही इशारा देत यंत्रांना सतर्क करण्यात आलं. तुर्की आणि मोरोक्कोच्या भूकंपांची पूर्वसूचना देणाऱ्या फ्रँक हूगरबीट्स या डच संशोधकानं भूकंपाचा दावा केला म्हणजे भूकंप येईलच असं नाही. पण, तरीही सतर्कता बाळगणं योग्य राहील अशा शब्दात जाहीर इशारा दिल्याचं पाहायला मिळालं होतं.