Earthquake tremors in Delhi NCR : राजधानी दिल्लीत मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवलेत. मध्यरात्री 1 वाजून 19 मिनिटाला भूकंपाचे धक्के बसलेत. भूकंपाची तीव्रता 3.8 रिस्टर स्केल इतकी होती. हरियाणातील झग्गरमध्ये भूंकपाचा केंद्रबिंदू होता. रात्री उशिरापर्यंत भूकंपाचे धक्के जानवलेत.
भूकंप होताच जमिनिला हादरे जाणवल्याने लोक घाबरुन घराबाहेर आले. तर काही लोक झोपले होते त्यामुळे त्यांना या भूकंपाची माहिती नाही. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली. मध्यरात्री 1 वाजून 19 मिनिटाने भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.8 रिस्टर स्केल इतकी होती. हरियाणातील झग्गरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीमध्ये 5 किलोमीटर अंतरापर्यंत खाली होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी हा भूकंप रविवारी पहाटे 1.19 वाजता झाला. त्याचे केंद्र दिल्लीला लागून असलेला हरियाणातील झज्जर जिल्हा होता. तेथे अचानक पृथ्वी जमिनीच्या खाली 5 किमी हादरली, त्यामुळे झज्जर, दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने जल्लोषात मग्न झालेल्या लोकांना आणि झोपेचेही भान आले नाही. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
Earthquake tremors felt in Delhi and surrounding areas pic.twitter.com/LUDHAHPpey
— ANI (@ANI) December 31, 2022
दुसरीकडे, नवीन वर्षावर दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप होताच सोशल मीडियावर चर्चा होती तसेच मीम्सचा महापूर आला आहे. एका यूजरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिले, 'मी सहमत नाही, पुरावा दाखवा'.