मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्या देशातील अनेक तरुण रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. तुम्हीसुद्धा रेल्वेकडून नोकरीची अधिसूचना जाहीर होण्याची ते आतुरतेने वाट पाहत असाल. (east railway recruitment)
पूर्व रेल्वेने 2972 अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डाचे 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये 8 वी पास असलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे.
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला अधिकृत अधिसूचनेजवळ ऑनलाइन अर्जाची लिंक (https://rrcrecruit.co.in/rrceraprt22/) दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर सर्व माहिती भरून, प्रमाणपत्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
ही नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
पूर्व रेल्वे अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी नियमांनुसार मासिक वेतन दिले जाईल. तुम्हीही रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.