आताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला

Assam SEBA 10th Board Exam: नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10ची बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम 4 वर्षांचा असेल. विद्यार्थी एकाच वेळी दोन पदवी घेऊ शकतात.

राजीव कासले | Updated: Jun 6, 2023, 03:25 PM IST
आताची मोठी बातमी! 'या' राज्यात आता 10 वी बोर्ड परीक्षा नसणार, 'असा' असेल नवा शैक्षणिक फॉर्म्युला title=

Assam SEBA 10 Board Exam: महाराष्ट्रात नुकताच दहावीचा निकाल (SSC Result) लागला. यंदा राज्याचा 93 टक्के इतका निकाल लागला. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलासाठी दहावी हा महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीत चांगले गुण मिळवत विद्यार्थी नव्या वाटा निवडतात. पण आसाममध्ये (Asam) आता दहावीच्या बोर्ड परीक्षाच रद्द (10th Borad Exam Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी नव्या शैक्षणिक धोरणातंर्गत ही घोषणा केली आहे. आसाममध्ये येत्या शैक्षणिक वर्ष 2024 पासून विद्यार्थ्यांसाठी दहावी बोर्डाची परीक्षा नसणार आहे. आसाम राज्य सरकार एक नवं शैक्षणिक बोर्ड स्थापन करणार आहे. 

आसाममध्ये 10 वी इयत्तेची परीक्षा बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन आसाम (SEBA) द्वारा घेतली जाते. तर 12 वी परीक्षा आसाम हायर सेकेंडरी एज्युकेशन काऊंसिल (AHSEC) द्वारा घेतली जाते. आता दोन्ही बोर्डांचं विलिनीकरण करण्यात आलं आहे. 10व्या इयत्तेत आता केवळ पास आणि नापास हीच प्रणाली असेल. बोर्ड परीक्षा थेट बारावीला लागू असेल. 10 परीक्षेत उत्तार्ण झालेल्या विद्यार्थ्यंना 11 वीत प्रवेश घेण्याची गरज भासणार नाही. नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी उत्तार्ण विद्यार्थी पुढच्या वर्गात म्हणजे 11 वीत जातील. 

नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. आसाममध्ये शाळा आणि कॉलेजचं विलिनीकरण होईल. राज्यात 5+3+3+4 फॉर्म्युलावर आधारीत शिकवलं जाईल. पहिली पाच वर्ष म्हणजे दुसरीपर्यंत प्ले ग्रुप असेल. त्यानंतर इयत्ता 3 ते इयत्ता पाचवीपर्यंत प्राथमिक वर्ग असतील. त्यानंतर 6,7,8 वी असा एक टप्पा असेल तर चौथा टप्पा नववी ते 12 बारावी पर्यंत असा असेल. 

Assam Board 12th Result जाहीर
आसाम बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी बारावीचा एकूण 70.12 टक्के इतका निकाल लागला आहे. सायन्स विभागात 84.96 तर कॉमर्स विभागात 79.57 इतके टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

महाराष्ट्रात शैक्षणिक धोरण
देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं आहे. या धोरणात अनेक मोठे बदल सुचवण्यात आले असून केंद्र सरकारने देखील या धोरणाला मंजूरी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज विविध स्तरातून पसरविला गेला होता. पण महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षाच असणार आहेत. पुढील वर्षी देखील दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणेच होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे.