ओबीसींसाठी भुजबळांसोबत एकत्र लढणार - खडसे

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही व्यक्त केली जात आहे.

Updated: Jun 14, 2018, 04:32 PM IST
ओबीसींसाठी भुजबळांसोबत एकत्र लढणार - खडसे title=

नवी दिल्ली  : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही व्यक्त केली जात आहे. भुजबळांवर अन्याय झाल्यामुळे ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी उभा असल्याची वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केलंय. भुजबळांसोबत ओबीसींच्या समस्यासाठी एकत्रित लढा देणार असल्याचं खडसेंनी जाहीर केलं. तुरुंगातून सुटल्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर गेलेत. नाशिकमध्ये भुजबळांचे जोरदार स्वागत करण्यात आले.