नवी दिल्ली : इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमीशन (डीईआरसी) ने दिल्लीकरांसाठी आनंदाची बातमी दिलीयं. वीज बोर्डाने विजेच्या बिलाची पुनर्धबांधणी केली आहे. याचा फायदा निश्चितपणे ग्राहकांना होणार आहे. विजेच्या बिलाच्या मूळ किंमत वाढवली गेली असून प्रति युनिट वीजेचे बील घटविण्यात आले आहे. ४०० युनिटपेक्षा कमी विजेचा वापर करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नवे दर हे २०१८-१९ वर्षासाठी असणार आहेत. ० ते २०० यूनिट विज वापरणाऱ्यांना प्रति यूनिट ३ रुपयांप्रमाणे विजेचे बिल द्यावे लागले. म्हणजेच पहिल्या बिलाच्या तुलनेत १ रुपयाने बिल कमी होणार आहे.
२०१ ते ४०० युनिट वीज वापरणाऱ्यांना ४.५ रुपये प्रति युनिटप्रमाणे बील द्यावे लागले. आतापर्यंत प्रत्येक युनिटमागे ५.९५ रुपये द्यावे लागत होते. ४०१ ते ८०० रुपये प्रति यूनिट खर्च करणाऱ्यांना ६.५ रुपये प्रति युनिट द्यावे लागणार आहेत, ज्याचे आतापर्यंत ७.३० प्रति युनिट द्यावे लागत होते. ८०१ ते १२०० रुपये प्रतियुनिट वीज वापरणाऱ्यांना ७ रुपये प्रति युनिटप्रमाणे विज बिल द्यावे लागणार आहे. आतापर्यंत यासाठी ८.१० रुपये द्यावे लागत होते.
२ किलोवॅटपर्यंत विजेचा फिक्स चार्ज २० रुपयांना वाढवून १२५ रुपये केले आहे. तर २ ते ५ किलोवॅटवरील फिक्स्ड चार्ज ३५ रुपयांपासून वाढवून १४० रुपये करण्यात आलायं. याआधी २०१७ मध्ये विजेच्या दरात बदल करण्यात आले होते.