Paternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा...

Paternity Leave पुरुष कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीकडून आनंदाची बातमी... वडील झाल्यास मिळणार इतक्या आठवड्यांची सुट्टी आणि फक्त स्वत : बाळ नाही तर दत्तक असेल तरी मिळेल सुट्टी...

Updated: Jan 6, 2023, 04:44 PM IST
Paternity Leave : पुरुष कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Good News द्या आणि मिळवा... title=

Paternity Leave : फार्मा कंपनी फायझर इंडियानं (Pfizer India) यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या पुढे फायझर इंडियाच्या पुरुष कर्मचाऱ्यांना वडील झाल्यानंतर 12 आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे. खरंतर फायझर इंडियानं 12 आठवड्याचे हे नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू केले आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांना ही पॅटर्निटी लीव्ह चार टप्प्यांमध्ये घेता येणार आहे. ही लीव्ह फक्त स्वत: च्या बाळासाठी नाही तर दत्तक घेतलेल्या बाळाच्या वडिलांनाही घेता येणार आहे. फायझर इंडियानं गुरुवारी ही मोठी घोषणा केली आहे. 

आता कशा प्रकारे घेऊ शकता सुट्टी (Paternity Leave) 

फायझर इंडिया कंपनीच्या नव्या पॉलिसीमुळे स्वत: बाळ किंवा मग दत्तक घेतलेल्या मुलांच्या वडिलांना दोन वर्षाच्या काळात 12 आठवड्यांच्या सुट्ट्या घेता येणार आहेत. फायझर इंडियाचे कर्मचारी ही चार टप्प्यात सुट्टी घेऊ शकतात. याशिवाय वडील झाल्यावर कशा प्रकारे सुट्टी घेऊ शकता असा प्रश्न असेल तर, तुम्ही एकावेळी कमीत कमी दोन आठवड्याची सुट्टी आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांची सुट्टी घेण्याचा पर्याय कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिला आहे. तर या सगळ्या सुट्ट्यांमध्ये कॅज्युअल लीव्ह (Casual Leave), इलेक्टिक्व लिव्ह्स (Elective Holidays) आणि त्यासोबत पॅटर्निटी लीव्ह  (Paternity Leave) मिळून सुट्टी घेण्याचा ऑप्शन देखील दिला आहे. 

दरम्यान, हे पाहता पॅटर्निटी लीव्ह मध्ये अनेक कंपन्यांकडून वाढ करण्यात आली आहे. बाळाला सांभाळण्याची जबाबदारी फक्त आईची नाही तर वडिलांचीही आहे. खरंतर बाळाच्या जन्मानंतर आई आणि वडील दोघांनीही बाळाचे संगोपन केले पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे. हे पाहता कंपनी आता पॅटर्निटी लीव्हच्या संख्येत वाढ करत आहेत.  

हेही वाचा : Kissing Scene मुळं अभिनेत्याला पत्नीनं जखमी होईपर्यंत चोपलं

फायझर इंडियाचे डायरेक्टर पीपल एक्सपिरिअन्स शिल्पी सिंह यांनी पॅटर्निटी लीव्हवर कंपनीचे मत मांडले आहे. 'फायझरमध्ये, आम्ही जे काही करतो त्याचे सगळे लक्ष हे कर्मचारी असतात. आमचा विश्वास आहे की प्रगतीशील कार्यक्षेत्राचे भविष्य म्हणजे सगळ्यात आधी कर्मचाऱ्यांचा विचार करायचा. 12-आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसी आमच्या पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना पालकत्वाचा अनुभव आणि आनंददायक क्षण जपण्यास नक्कीच मदत करेल.'

पुढे शिल्पी सिंह, 'हे प्रगतीशील धोरण यासाठी आहे ती कामाच्या ठिकाणी समानता दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्त्री असो किंवा मग पुरुष दोघांनाही पालक म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या आणि आनंद घेता येईल.'