Kissing Scene मुळं अभिनेत्याला पत्नीनं जखमी होईपर्यंत चोपलं

Kissing Scene मुळे या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात खळबळ... जाणून घ्या काय झालं संपूर्ण प्रकरण... अभिनेत्यानं स्वत: केला हा धक्कादायक खुलासा, तर वाचून तुम्हालाही बसेल धक्का की अभिनेत्याचा किसींग सीन पाहताच हे काय करते त्याची पत्नी

Updated: Jan 6, 2023, 03:53 PM IST
Kissing Scene मुळं अभिनेत्याला पत्नीनं जखमी होईपर्यंत चोपलं title=

Emraan Hashmi Talk About Wife's Reactiong On His Kissing Scene : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. इमरान हा त्याच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. इमरानच्या भूमिकांमुळे त्याला ‘सिरियल किसर’ (Emraan Hashmi Serial Kisser) असेही म्हटले जाते. इमरान चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देण्यासाठी ओळखला जातो. इमरान हाश्मी हा विवाहीत आहे. दरुम्यान, एका मुलाखतीत इमरानला त्यानं असे सीन देण्यावर त्याची पत्नी परवीन शाहनीची कशी प्रतिक्रिया असते असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर आता इमरान उत्तर दिलं आहे. 2016 मध्ये तिच्या 'द किस ऑफ लाइफ' या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी त्यानं हा खुलासा केला होता. चित्रपटांमधील माझ्या इंटिमेट सीन्सचा तिला राग यायचा. पण आता हळूहळू त्या रागावण्यावर आणि मारण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत.

इतकंच काय तर इमराननं एका मुलाखतीत सांगिते होते की चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिल्यामुळे त्याची पत्नी परवीन शाहनी त्याला मारते असा खुलासा केला होता. 'ती अजूनही मला मारते, पण आता आधीच्या तुलनेने कमी मारते. आधी ती बॅगनं मारायची आणि आता हाताने मारते. इतक्या वर्षांनंतर मारण्यात इतका बदल झाला आहे.'

पत्नी परवीन चिडल्यानंतर तिला कसं शांत करतो इमरान

इमरान पुढे परवीन चिडल्यावर तिला कशा प्रकारे शांत करतो हे देखील सांगितले आहे. परवीन चिडल्यावर तिला शांत करण्यासाठी मी भेट म्हणून तिला हॅंडबॅग गिफ्ट करतो. प्रत्येक चित्रपटातील सीनसाठी मी तिला एक बॅग गिफ्ट म्हणून देतो. त्यामुळे आता तिच्याकडे बॅगांनी भरलेलं कपाट आहे, तरीही तिला बॅग हवी आहे. तिला बॅग खूप आवड सून ती कलेक्शन करते. त्यामुळेच आमच्यात ही डील झाली आहे, असं इमरान मुलाखतीत म्हणाला. 

पत्नी परवीनं इमरानला मारलं होतं.

2010 साली दिलेल्या एका मुलाखतीत इमरान किसिंग सीन पाहिल्यावर परवीन कशी रिअॅक्ट करते हे सांगत म्हणाला, परवीनने त्याचा ‘क्रूक’ चित्रपट पाहिल्यानंतर तिने त्याला मारलं होतं. माझ्या चित्रपटांच्या पहिल्या स्क्रिनिंगमधून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझ्या पत्नीनं मलाा मारलं. पण काहीही झालं तरी तिला माहित आहे की माझं तेच काम आहे किंवा माझ्या कामाचा तो एक भाग आहे. त्यामुळे मला ते सीन करावेच लागणार. 

कॉफी विथ करणमध्ये केला होता धक्कादायक खुलासा

याशिवाय 2014 साली इमराननं 'कॉफी विथ करण'मध्ये (Koffee With Karan) हजेरी लावली होती. तेव्हा त्याच्या एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी त्याच्या पत्नीची कशी प्रतिक्रिया होती याविषयी खुलासा केला. आम्ही पहिल्या सीटवर बसलो होतो. तिथेच मला माझी पत्नी मला नखं मारू लागली होती. तू हे काय केलं आहेस? तू याविषयी मला आधी सांगितलं का नाहीस? तू जे काय करतोयस ते बॉलिवूड नाही? असं बरंच काही ती बोलत होती. तिनं मला इतकं मारलं की तिच्या नखांमुळे मला जखम झाल्या होत्या. याशिवाय माझं रक्त वाहू लागलं होतं.