हरियाणा : बहुतांश नोकरदार वर्ग आपल्या 8 ते 9 तासांच्या नोकरीत समाधानी असतो. चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी करण्याची हिम्मत फार कमी जणांमध्ये असते. हरियाणातील 2 इंजिनिअर तरुणांनी हजारो रुपयांची नोकरी सोडून चक्क व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आज ते यात यशस्वीही ठरले आहेत.
या इंजिनिअर तरुणांची नावं आहेत रोहित आणि सचिन. या दोघांनी एकत्र येत व्हेज बिर्याणीचा स्टॉल सुरु करण्याचा निर्णय घेतला. एका रस्त्याच्या कडेला त्यांनी हा स्टॉल सुरु केला आणि त्याला नाव दिलं इंजिनिअर्स व्हेज बिर्याणी.
इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण
या दोन्ही तरुणांनी पाच वर्षांचा इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं रोहित पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे, तर सचिनने बी.टेक. केलं आहे. पण दोघंही नोकरीत समाधानी नव्हते. यासाठी त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाने ते समाधानी आहेत. बिर्याणी विक्रीच्या व्यवसायात त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. महिन्याला त्यांना निव्वळ नफा सव्वा ते दीड लाख रुपये उत्पन्न ते कमवत आहेत.
इंजिनिअर्स व्हेज बिर्याणीला लोकांचा चांगला प्रतिसाद
अर्ध्या आणि पूर्ण प्लेटसाठी ग्राहकांना 50 आणि 70 रुपये खर्च करावे लागतात. स्पेशल ग्रेव्ही व्हेज बिर्याणी आणि आचारी व्हेज बिर्याणी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अल्पावधीतच त्यांची व्हेज बिर्याणी ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.