आता DigiLocker वरही मिळणार PF खात्याशी निगडीत सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर तुम्ही पीएफ सदस्य असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर...

Updated: Sep 22, 2021, 06:27 PM IST
आता DigiLocker वरही मिळणार PF खात्याशी निगडीत सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : तुम्हाला तुमच्या PF खात्याशी संबंधित असलेल्या अनेक सुविधा सरकारी मोबाइल अ‍ॅप UMANG, DigiLocker वर देखील मिळतील. डिजीलॉकर हे अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे जेथे कागदपत्रे सुरक्षितपणे साठवली जातात. DigiLocker मधील दस्तऐवज पडताळणीसाठी वापरले जाऊ शकतात आणि सरकारी संस्था ते स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. DigiLockerची लोकप्रियता पाहता सरकारने या मोबाईल अ‍ॅपवर ईपीएफओ सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.

ज्यांचे पीएफ खाते आहे ते आता DigiLockerवरून त्यांचे UAN कार्ड वापरू शकतात. EPFO नुसार, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN सरकारी ई-लॉकर मोबाईल अ‍ॅप Digilocker वर मिळवता येतो.

पीएफ खातेधारक डिजीलॉकरद्वारे UAN आणि PPO डाउनलोड करू शकतात. जर तुम्ही पीएफ सदस्य असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर तुम्ही ईपीएफओशी संबंधित अनेक कागदपत्रे डाउनलोड करू शकाल आणि पीएफशी संबंधित सुविधा मिळवू शकाल

 DigiLocker कडून UAN आणि PPO क्रमांक कसे मिळवायचे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-प्रथम तुम्हाला http://digilocker.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.
-येथे तुम्हाला साइन इन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि आपल्या खात्यात लॉग इन करा
-येथे आधार आणि यूजरनेम प्रविष्ट करा
-तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल, तो फॉर्ममध्ये टाका आणि सबमिटवर क्लिक करा
-आता 6 नंबर सिक्योरिटी कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा
-जारी केलेले दस्तऐवज दाखवले जातील, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
-त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला Get more issued documents वर क्लिक करावे लागेल
-Centrall Government या टॅबमध्ये जा आणि तेथे लिहिलेल्याEmployees Provident Fund Organization वर क्लिक करा
-आता तुम्हाला स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. येथे UAN वर क्लिक करा आणि UAN क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर Get Document वर क्लिक करा
-हे सर्व केल्यानंतर तुम्हाला UAN कार्ड PDF स्वरूपात दिसेल जे डाऊनलोड करता येईल.

DigiLocker काय आहे?

डिजीलॉकर हे एक ई-लॉकर आहे, ज्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवेश करता येतो. डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत हे ई-लॉकर सुरू करण्यात आले आहे. हे लॉकर पूर्णपणे इंटरनेटवर चालते आणि तुम्ही त्यात तुमचे सर्व महत्त्वाचे कागदपत्रे साठवू शकता. डिजीलोकरमध्ये जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे ऑनलाइन साठवली जाऊ शकतात. या लॉकरची सुविधा मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

परंतु हे Digilocker उघडायचे कसं असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो, ज्याची माहिती देखील आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

-यासाठी http://digilocker.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या
-साइन अप वर क्लिक करा
-तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. त्यात तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाका
-याद्वारे तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी पाठवला जातो. हा OTP तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक होईल
-फॉर्ममध्ये हा OTP एंटर करा आणि continue वर क्लिक करा
-यानंतर, जन्मतारीख, लिंग, ईमेल आयडी फॉर्ममध्ये प्रविष्ट करा. आधार मध्ये नमूद केल्याप्रमाणे पत्ता, नाव, जन्मतारीख आणि लिंग प्रविष्ट करा
-आता सबमिट वर क्लिक करा. जर तुम्ही मोबाईलने साइन अप केले असेल, तर तुम्हाला आधार क्रमांकही टाकावा लागेल
-आता तुम्हाला 6 अंकी सिक्योरिटी पिन सेट करावा लागेल. हा पिन तुमचा पासवर्ड म्हणून काम करेल. या आधारावर प्रत्येक वेळी लॉगिन आवश्यक असेल
-सिक्युरिटी पिन सेट होताच तुम्हाला डिजीलोकरमध्ये लॉग इन केले जाईल
-येथून तुम्ही UAN आणि PPO डाउनलोड करू शकता