नोकरदार वर्गाला आज मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता, PF डिपार्टमेंट करणार 'खूश'?

नोकदार वर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 21, 2018, 09:04 AM IST
नोकरदार वर्गाला आज मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता, PF डिपार्टमेंट करणार 'खूश'? title=

नवी दिल्ली : नोकदार वर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

व्याजदर कायम?

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं सध्याच्या आर्थिक वर्षासाठी ८.६५% व्याजदर कायम ठेवू शकतं.

चांगला नफा कमावला

या निर्णयामुळे ईपीएफओच्या तब्बल पाच कोटी खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे. EPFO ने या आर्थिक वर्षात आपल्या इक्विटी पोर्टफोलिओत चांगला नफा कमावला आहे. 

EPFO च्या व्याजरदरात घट झाल्यानंतर ८.५% व्याज देण्यावर विचार सुरु होता. मात्र, हा व्याज दर ८.६५% कायम ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आज होणार बैठक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ फंड डिपॉझिटवर देण्यात येणाऱ्या व्याजाचा मुद्दा आज होणाऱ्या ईपीएफओ बोर्डच्या बैठकीत होणार आहे. ईपीएफओचं सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज वर्ष संपण्यापूर्वी व्याज दर ठरवतं. मात्र, सूत्रांच्या मते सध्याचं आर्थिक वर्ष संपण्यास एकच महिना राहीला आहे. त्यामुळे व्याज दराचा मुद्दा याच बैठकीत येण्याची शक्यता आहे.

EPFO ने विकले एक्सचेंज ट्रेडेड फंड्स

सूत्रांच्या मते, EPFOने फेब्रुवारी महिन्यात २८८६ कोटी रुपयांचे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स विकले आहेत. यामुळे ईपीएफओच्या सध्याच्या आर्थिक वर्षासाठी ८.६५% व्याज दर कायम ठेवण्यास मदत मिळणार आहे. ईपीएफओने २०१६-१७ साठी ८.६५% व्याज दर ठरवला होता. हा व्याजदर २०१५-१६ मध्ये ८.८% होता.

ईटीएफमुळे चांगले रिटर्न

ईपीएफओने ऑगस्ट २०१५ पासून ईटीएफमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ईपीएफओने ईटीएफमध्ये जवळपास ४४,००० कोटी रुपयांची गुंतवणुक केली आहे. या गुंतवणुकीवर जवळपास १६ टक्के रिटर्न मिळाले आहेत.