EPFO (पीएफ) फक्त बचत योजना नाही, तर प्रत्येक सदस्याला ७ लाखांचं विमा कव्हर

कर्मचार्‍यांना ईडीएलआयमध्ये कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही. या योजनांचा क्लेम कर्मचार्‍याचा जोडीदार, मुलगी आणि अल्पवयीन मुलगा करु शकतो

Updated: May 16, 2021, 09:41 PM IST
EPFO (पीएफ) फक्त बचत योजना नाही, तर प्रत्येक सदस्याला ७ लाखांचं विमा कव्हर title=

मुंबई : तुम्ही जर खासगी नोकरी करत असाल तर, तुम्ही कोरोना साथीच्या काळात सरकारच्या त्या योजनांचा उपयोग केला पाहिजे, ज्या काहीही खर्च न करता उपलब्ध आहेत. त्याच बरोबर या योजना एखाद्या व्यक्तीचं काही बरं बाईट झालं, तरी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) आपल्या ग्राहकांना / सदस्य कर्मचार्‍यांना जीवन विमा सुविधा प्रदान करते. पीएफओचे सर्व ग्राहक कर्मचारी ठेव लिंक विमा योजना 1976 (EDLI) अंतर्गत येतात. ही विमा रक्कम 7 लाख रुपयांपर्यंत आहे. यापूर्वी ही रक्कम 6 लाख रुपये होती.

कोण या EDLI योजनेत दावा करु शकतो?

योजनेनुसार EDLI अंतर्गत नॅामीनी विमा कव्हर व्यक्तीचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यूनंतर क्लेम करु शकतो. या योजनेअंतर्गत असे लोकं ही येतात ज्यांनी 12 महिन्यांच्या आत एकापेक्षा जास्त कंपनीत काम केलेले आहे.

कर्मचार्‍यांना ईडीएलआयमध्ये कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही. या योजनांचा क्लेम कर्मचार्‍याचा जोडीदार, मुलगी आणि अल्पवयीन मुलगा करु शकतो. जर कोरोना महामारीमुळे देखील ईपीएफओ ग्राहक मरण पावला तर त्याचा नॅमिनी या विम्याचा दावा करू शकतो.

कंपनी प्रीमियम भरते

वास्तविक, या योजनेंतर्गत कंपनीद्वारे प्रीमियम भरला जातो. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांच्या 12% मूलभूत पगाराचा + डीए कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कडे जातो. 12 टक्के वाटा कंपनी / मालकाकडून दिला जोतो. या 12 टक्के वाट्यापैकी 8.33 टक्के कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेचा भाग EPS कडे तर उर्वरित भाग EPF कडे जातो.

EDLI योजनेत नियोक्ता प्रीमियम भरतो, जो कर्मचार्‍याच्या मूलभूत पगारा आणि महागाई भत्तेच्या 0.50 टक्के आहे. यातील जास्तीत जास्त मूलभूत पगाराची मर्यादा फक्त 15 हजार रुपये आहे.

दाव्याची गणना कशी केली जाईल?

EDLI योजनेत, कर्मचार्‍यांना मिळालेल्या मागील 12 महिन्यांचा मूलभूत पगारा + डीए च्या आधारे गणना केली जाते. अलीकडील दुरुस्ती अंतर्गत आता या विमा संरचनेचा दावा मागील मूलभूत पगारा + डीएच्या 35 पट असेल, जो यापूर्वी 30 पट होता. तसेच, आता जास्तीत जास्त 1.75 लाख रुपयांचा बोनस असेल जो आधी जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये होता. हा बोनस गेल्या 12 महिन्यांत पीएफच्या सरासरीच्या 50 टक्के शिल्लक मानला जातो.

उदाहरणार्थ, जर मागील 12 महिन्यांच्या ईपीएफओ सदस्याचा मूलभूत वेतन + डीए 15000 रुपये असेल तर विमा क्लेम (35 x 15,000) + 1,75,000 = 7 लाख रुपये. ही जास्तीत जास्त हक्काची रक्कम मिळेल.

दावा कसा करावा?

जर ईपीएफ ग्राहक अकाली मरण पावला तर, त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा कवचा दावा करु शकतात. हक्क सांगणार्‍याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचा / तिचा पालक त्यांच्या वतीने दावा करु शकतात. यासाठी विमा कंपनीने अल्पवयीन नॉमिनीच्या वतीने पालकांनी केलेल्या दाव्यावर कर्मचार्‍यांचा मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, पालकत्व प्रमाणपत्र आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे.

जर पीएफ खात्यावर कोणी नॅामिनी नसेल तर कायदेशीर वारस यावर दावा करु शकतात. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी, नियोक्ताकडे जमा करावयाचा फॉर्म विमा संरक्षणाचा फॉर्म 5IF देखील सादर करणे आवश्यक आहे.