मुंबई : कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या (EPFO)सदस्यांना पीएफ (PF)खात्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण नियमांची माहिती नसते. हेच कारण आहे की, काही ग्राहक त्यांच्या खात्याशी संबंधित फायद्यांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा लोकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे आणि केंद्र सरकारकडून आपल्या खात्यावर जास्तीच्या 50 हजार रुपयांचा फायदा कसा मिळवावा याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
EDLI योजनेअंतर्गत विमा, निवृत्तीवेतन, 7 लाख रुपयांपर्यंत इंशोरन्स, इनकम टॅक्स डिडक्शन यासारखे नियम आणि फायदे ग्राहकांना माहिती आहेत. परंतु या नियमांव्यतिरिक्त Loyalty-cum-Life बेनिफिटशरी संबंधित एक नियम देखील आहे. याअंतर्गत सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
खरेतर सर्व पीएफ खातेधारकांना नोकरी बदलल्यानंतरही एकच ईपीएफ खाता सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे सलग 20 वर्षे त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याने त्यांना Loyalty-cum-Lifeचा लाभ मिळू शकेल.
ईपीएफओ तज्ज्ञ भानू प्रताप शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, CBDTने त्या ईपीएफ खातेदारांना Loyalty-cum-Life चा लाभ देण्याची विनंती केली आहे, ज्यांनी 20 वर्षांसाठी एकाच खात्यात आपल्या पीएफ चे योगदान दिले आहे. केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा आहे की, जर कोणी यासाठी पात्र असेल, त्या कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल.
Loyalty-cum-Lifeबेनिफिट अंतर्गत, 5 हजार रुपयांपर्यंत मूलभूत पगाराच्या लोकांना 30 हजार रुपयांचा लाभ मिळेल. तर 5 हजार 1 ते 10, हजार रुपयांपर्यंत मूलभूत पगार असणाऱ्यांना 40 हजार रुपये आणि मूलभूत पगारा 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असल्यास त्यांना Loyalty-cum-Life अंतर्गत 50 हजार रुपयांचा लाभ मिळेल.
ईपीएफओच्या सदस्यांना याचा फायदा घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांनी नोकरी बदलली तरी त्यांनी एकच ईपीएफ खात्या सुरु ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नवीन कंपनीला तुमच्या जुन्या अकाउंटची माहिती द्यावी लागेल. तसेच पीएफ विड्रॉल (PF Withdarwal)करु नये. असे केल्याने सदस्यांना इनकम टॅक्ससह सेवानिवृत्ती निधीत देखील तोटा सहन करावा लागतो. असे केल्यास निवृत्तीवेतनाचे फायदे आणि लॉयल्टी देखील मिळणार नाही.