Indian Railways Helpline: लांबच्या प्रवास करण्यासाठी लोकं नेहमीच भारतीय रेल्वेला पहिले प्राधान्य देतात. रेल्वेही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वोत्कृष्ट पावले उचलत आहे. रेल्वे ग्राहकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सज्ज आहे. अशा परिस्थितीत, प्रवासादरम्यान किंवा त्यासंदर्भात तुम्हाला काही तक्रार किंवा सूचना असल्यास, भारतीय रेल्वेच्या 139 क्रमांकाच्या हेल्पलाइनचा तुम्हाला खूप उपयोग होतो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या एका हेल्पलाइन नंबरवर दिली जातात.
भारतीय रेल्वेचा हा हेल्पलाइन क्रमांक इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) वर आधारित आहे. येथे प्रवाशांना सुरक्षितता आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, चौकशी, खानपान, सामान्य तक्रार, दक्षता, रेल्वे अपघात यासंबंधी माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल.
139 वर कॉल करून कोणत्या नंबरची सेवा?
एसएमएसद्वारे माहिती मिळू शकते
139 हा क्रमांक IVRS- इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित आहे. सर्व मोबाईल फोन वापरकर्ते 139 वर कॉल करू शकतात. प्रवासी या क्रमांकावर ट्रेनशी संबंधित चौकशी आणि आरक्षण संबंधित चौकशी जसे की पीएनआर स्थिती, तिकीट (सामान्य आणि तत्काळ) उपलब्धता, ट्रेनचे आगमन, निर्गमन यासाठी एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात.