माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक

माजी आमदार अमित जोगी यांना अटक

Updated: Sep 3, 2019, 01:00 PM IST
माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक title=

रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांना अटक करण्यात आली आहे. माजी आमदार अमित जोगी यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मरवाही सदन येथून त्यांना अटक केली. या दरम्यान त्यांच्या बंगल्याबाहेर अनेक कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांनी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली.

अमित जोगी जेव्हा आमदार होते तेव्हा 3 फेब्रुवारी 2018 ला त्यांच्या विरोधात गोरेला पोलीस स्थानकात कलम 420 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता. 2013 मध्ये मरवाही विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या समीरा पैकरा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार अमित जोगी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जन्मस्थळबाबत चुकीची माहिती दिली होती. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीना पैकरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने 4 दिवसांपूर्वी सुनावणीत म्हटलं होतं की, छत्तीसगड विधानसभेचं सत्र संपलं आहे. त्यामुळे ही याचिका आता रद्द करण्यात येते.

कोर्टाच्या निर्णयानंतर समीरा पैकरा यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'अमित जोगी यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांचा जन्म 1978 ला गौरेला येथील सारबहरा येथे झाला असं सांगितलं आहे. पण त्यांचा जन्म 1977 ला अमेरिकेतील डगलॉस येथे झाला आहे.'