VIRAL VIDEO : लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड आणि...

तिला पाहून वराला आश्चर्याचा धक्का बसलाच पण त्याच्या होणाऱ्या वधूला बसलेला धक्का त्यापेक्षा तीव्र होता

Updated: Apr 11, 2019, 10:31 AM IST
VIRAL VIDEO : लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड आणि...   title=

नवी दिल्ली : एखाद्या लग्नातील सर्वात वाईट वेळ कोणती असू शकते? हा व्हिडिओ पाहून कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल... कल्पना करा की वराच्या पेहरावात तुम्ही स्टेजवर उभे आहात... तुमच्यासमोर होणारी वधू तुमचा हातात हात घेऊन उभी आहे.... तुमची सगळे नातेवाईक आणि मित्र-मंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी समोर जमले आहेत... आणि एवढ्यात तुमची एक्स-गर्लफ्रेंड वधूच्या वेषात तुमच्यासमोर येऊन उभी राहिली तर...

कल्पना करूनच सुन्न झालं असेल ना! पण अशी वेळ खरोखरच एका वरावर येऊन ठेपली... आणि मग पुढे काय घडलं, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरही दाखल झाला. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला, हे काही वेगळं सांगायला नको...

चीनमध्ये ही घटना घडलीय. ख्रिश्चन पद्धतीनं पार पडलेल्या या लग्नात वर आपल्या वधूला किस करणार तेवढ्यात त्याची एक्स-गर्लफ्रेंड वधूच्या वेषात त्याच्यासमोर उपस्थित झाली. चक्क गुढघ्यांवर बसत ती वराकडे आपली चूक झाली असल्याचं मान्य करत आपल्याकडे परत येण्याची विनंती करू लागली... तिला पाहून वराला आश्चर्याचा धक्का बसलाच पण त्याच्या होणाऱ्या वधूला बसलेला धक्का त्यापेक्षा तीव्र होता. वधू तत्काळ लग्नमंडपातून निघून गेली... आणि तिच्या मागे वरानंही तिची समजूत काढण्यासाठी जावं लागलं. 

अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय... एखाद्या बॉलिवूड सिनेमाला शोभेल अशी घटना असली तरी ती खऱ्या आयुष्यात घडलीय.