ATM मधून जर फाटलेली नोट आली तर काय करावं?

ATM मधून पैसे काढताना जर तुम्हाला चुकून फाटलेली नोट आली तर करा हे काम

Updated: Oct 14, 2021, 07:07 PM IST
ATM मधून जर फाटलेली नोट आली तर काय करावं?  title=

मुंबई: आजकाल सर्वजण ऑनलाइन पेमेंट करण्यावर जास्त भर देतात. मात्र तरीही हा नियम तुम्हाला माहीत असायलाच हवा. ATM वापरण्याचं प्रमाण जरी कमी झालं असलं, तरी अनेक ठिकाणी अजूनही पैसे काढण्यासाठी ATM वापरलं जातं. अशावेळी जर चुकून ATM मधून पैसे येताना त्यामध्ये फाटलेली नोट आली तर काय करावं. फाटलेली नोट कोणी घेत नाही मग अशावेळी काय करावं? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या नोट तुम्ही कशा बदलू शकणार आहात याबद्दल.
 
RBI च्या नियमांनुसार तुम्ही बँकेत जाऊन जुन्या किंवा चिकटलेल्या नोटा सहज बदलू शकता. RBI च्या नियमानुसार बँका त्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत. फक्त अशा नोटा बनावट असू नयेत. जर कोणत्याही बँकेने नोटा घेण्यास नकार दिला तर तुम्ही RBI कडे तक्रार करू शकता, त्यानंतर त्या बँकेवर कारवाई केली जाऊ शकते.

RBI च्या नियमानुसार नोटेचा तुकडा झालेला असेल तरीही ती वापरली जाऊ शकते. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला तरी तो बदलता येतो. साधारण फाटलेल्या नोटा या कोणत्याही बँकेच्या शाखेतील काऊंटरवर जाऊन बदलता येऊ शकतात. इतकच नाही तर तुम्हाला RBIच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन या नोटा बदलता येतात. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही.

सर्वसामान्य नोट फाटली असेल तर पूर्ण पैसे मिळतात. तर नोट जास्त फाटलेली असेल तर त्या पैशांमधील काही रक्कम वजा होऊन तुम्हाला पैसे मिळू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 रुपयापासून ते 20 रुपयांपर्यंत पैसे असतील तर ती रक्कम पूर्ण दिली जाते. तर 50 ते 2000 रुपयांपर्यंत नोट असतील तर त्यातील अर्धी रक्कम कापून घेण्याचं प्रावधान आहे. 

आरबीआयच्या नियमांनुसार, खराब झालेल्या किंवा जळलेल्या, तुकडे तुकडे बारीक झालेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतात. अशा नोटांद्वारे तुम्ही तुमचे बिल किंवा कर बँकेतच भरू शकता.