ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याबाबत सोशल मीडियावर मोहिम; नेटकऱ्यांच्या मागणीनंतर सरकारचे स्पष्टीकरण

ITR Filing Last Date : आयकर रिटर्न भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. आता सोशल मीडियावर ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे  दरम्यान, सरकारकडून एक मोठे वक्तव्य आले आहे.

Updated: Jul 28, 2022, 11:47 AM IST
ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याबाबत सोशल मीडियावर मोहिम; नेटकऱ्यांच्या मागणीनंतर सरकारचे स्पष्टीकरण title=

 

ITR Filing Last Date: आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै जवळ येत असल्याने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याची मागणी करदात्यांनी सरकारकडे केली आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर अनेक वापरकर्त्यांनी तांत्रिक बिघाडाबद्दल बोलले आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. आता सोशल मीडियावर ही शेवटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

20 हजार ट्विट

सध्या 'Extend Deut Date Immediately' सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगसह सुमारे 20 हजार ट्विट करण्यात आले आहेत. याआधीही सोशल मीडियावर अशी मोहीम रंगत आली होती. 'Extend Due Date Immediately' हा हॅशटॅग वापरून वापरकर्ते त्यांच्या समस्या सांगत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही मदत मागितली आहे.

केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज यांनी आधीच स्पष्ट केले आहे की आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. बजाज म्हणाले की, शेवटची तारीख वाढवण्याची अद्याप कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी शेवटच्या दिवशी आम्हाला 50 लाख रिटर्न मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 

पोर्टलचा स्क्रीनशॉट घेऊन विनंती

वापरकर्त्यांनी अनेक प्रकारे शेवटची तारीख वाढवण्याची विनंती केली आहे. कोणीतरी आयटीआर पोर्टलचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो शेअर केला आणि लिहिले की पोर्टल पुन्हा डाऊन झाले आहे.

विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै 2022 पर्यंत 2022-23 मूल्यांकन वर्षासाठी 3 कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. 31 जुलैनंतर आयटीआर भरण्यासाठी करदात्यांना दंड भरावा लागू शकतो.