लव सेक्स धोका! ऑफिसच्या बॉससोबत तरूणीचं अफेर त्यानेच केला घात मात्र...धक्कादायक घटना समोर

तीन वर्ष बॉससोबत ठेवले अनैतिक संबंध पण....

Harish & Updated: Aug 29, 2022, 07:12 PM IST
लव सेक्स धोका! ऑफिसच्या बॉससोबत तरूणीचं अफेर त्यानेच केला घात मात्र...धक्कादायक घटना समोर title=

Crime News : ऑफिसमधील बॉससोबत अनैतिक संबंध होते मात्र त्याच बॉसने तरूणीच्या हत्येची सुपारी देत तिला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणामध्ये  5 आरोपींना अटक केली आहे. 

नक्की काय आहे प्रकरण? 
दोन तीन वर्षापासून ऑफिसमधील बॉस अनुजसोबत मृत तरूणीचे अनैतिक संबंध होते. लग्नाचं आमीष दाखवत आरोपी अनुजने तिच्यासोबत तीन वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. तरूणीने लग्नासाठी त्याच्यामागे तगादा लावला होता मात्र अनुज हा मॅरिड होता. त्याने ही गोष्ट तरूणीपासून लपवली होती. 

असा रचला कट
लग्न करण्याचा आग्रह केल्यामुळे अनुजने मुलीला मारण्याचा कट रचला. त्याने कंपनीत काम करणाऱ्या जयप्रकाश दुर्गाला कटामध्ये सहभागी केलं. जयप्रकाशने दुर्गाला हत्येसाठी दोन लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. दुर्गाने त्याचा मित्र पंकज याला हाताशी धरत पंकजच्या गाझियाबादमधील श्याम, शरीफ आणि सुमित या गुंडांना मारण्याची सुपारी दिली. 

27 ऑगस्टला श्याम, सुमीत आणि शरीफ कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. सुमित बाहेर रस्त्यावर थांबला तर श्याम आणि शरीफ तिसर्‍या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये गेले तिथं ती टेलिकॉलर मुलगी हजर होती. दोघांनी मुलीचा गळा चिरून खून केला. 

असा झाला उलगडा
आरोपींनी मुलीचा गळा कापून हत्या केली आणि तिथून ते पसार झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना तरूणीच्या पर्समधून अनुजचा फोटो आणि मंगळसुत्र सापडलं. त्यानंतर पोलिसांनी अनुजला ताब्यात घेतलं आणि तपास सुरू केला. सुरूवातीला त्याने तपासामध्ये सहकार्य केलं नाही मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. ही घटना दिल्लीतील एका फायनान्स कंपनीमध्ये घडली आहे.