Sandhya Devanathan : Meta इंडियाच्या प्रमुखपदी निवड झालेल्या संध्या देवनाथन कोण आहेत? जाणून घ्या...

Sandhya Devanathan : फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाने संध्या देवनाथन यांची भारतातील नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. देवनाथन यांना 20 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांना हे मोठे पद देण्यात आले आहे.

Updated: Nov 17, 2022, 05:45 PM IST
Sandhya Devanathan : Meta इंडियाच्या प्रमुखपदी निवड झालेल्या संध्या देवनाथन कोण आहेत? जाणून घ्या... title=

Sandhya Devanathan Meta's New India Head : ट्विटरपाठोपाठ फेसबुकची (Facebook) मातृकंपनी असलेल्या मेटानेही (Meta) तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्याआधी मेटाचे भारतातील प्रमुख अजित मोहन (Ajit Mohan) यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. अजित मोहन हे 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे (Facebook India) व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर फेसबुकला धक्का बसला होता. त्यानंतर आता कंपनीने संध्या देवनाथन  (Sandhya Devanathan) यांची भारतातील प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मेटाचे अधिकारी मार्ने लेव्हिन यांनी अभिनंदन करताना भारतात मेटाच्या निरंतर वाढीसाठी संध्या देवनाथन यांचे स्वागत करताना आनंद होत आहे, असे म्हटले आहे.

"भारतासाठी आमच्या नवीन हेडच्या रूपात संध्या देवनाथन यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. मेटाचा व्यवसाय वाढवणे, अपवादात्मक आणि सर्वसमावेशक टीम तयार करण्यात, उत्पादनात नावीन्य आणण्यात संध्या यांचा हातखंडा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मेटाच्या निरंतर वाढीबद्दल आम्ही उत्साहित आहोत," असे मार्ने लेव्हिन म्हणाले.

कोण आहेत संध्या देवनाथन? (Who is Sandhya Devanathan)

मेटाने संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. संध्या देवनाथन 1 जानेवारी 2023 रोजी हे पदभार स्वीकारणार आहेत. 1998 मध्ये आंध्र विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संध्या देवनाथन यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीए केले. 2014 मध्ये त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साईद बिझनेस स्कूलमध्ये (Saïd Business School) गेल्या होत्या . संध्या देवनाथन भारतात परतल्या नंतर टीमचे नेतृत्व करणार आहेत. 

संध्या देवनाथन भारतील मेटाचा व्यवसाय वाढवण्यासाठी भागीदार आणि ग्राहकांची मदत करणार आहेत. व्यवसाय वाढवण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. संध्या देवनाथन यांच्याकडे बँकिंग, पेमेंट्स आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. 2016 मध्ये देवनाथन यांनी मेटामध्ये प्रवेश केला होता.