Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

Updated: Feb 1, 2023, 08:59 AM IST
Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या... title=
nirmala sitharaman Budget 2023

Union Budget 2023 : सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला अर्थसंक्लप (Budget 2023) उद्या लोकसभेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण् (Finance Minister Nirmala Sitharaman) उद्या संसदेत पाचव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2023) मांडतील. आज निर्मला सीतारमण् (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक सर्वेक्षण (economic survey) सादर केला.  या आर्थिक सर्वेक्षणातून मोठा दिलासा भारतीयांना मिळाला आहे. त्यामुळे आता बजेटमधून कोणाला काय मिळणार? असा प्रश्न विचारला असताना आता सीतारमण् यांनी मोठं वक्तव्य केलंय. (Finance Minister nirmala sitharaman give hint about Union Budget 2023 will be helpfull for middle class people marathi news)

गेल्या अनेक वर्षांपासून देशातील महागाई (Inflation) हा चर्चेचा विषय आहे. गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी आणखी वाढत असल्याने महागाई दर (Inflation Rate) नियंत्रणात राहिल की नाही?, असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याच आता निर्मला सीतारमण् (Nirmala Sitharaman) यांनी एका मुलाखतीमध्ये आश्वासक उद्गार काढले आहेत.

आणखी वाचा - Budget 2023: अर्थसंकल्पापूर्वी महागाईबाबत मोठी अपडेट, पाहा काय होणार?

काय म्हणाल्या निर्मला सितारामन?

होय, मी स्वत: मध्यमवर्गीय (Middle Class) आहे. त्यामुळे मध्यमवर्गींना होणाऱ्या त्रासाची मला पूर्ण कल्पना आहे. गेल्या काही वर्षात आम्ही मध्यमवर्गीयांवर कोणतेही नवीन कर (New Tax) लादलेले नाहीत. टॅक्स स्लॅब (Tax slab) मध्ये देखील बदल केले गेले नाहीत, त्याचा मध्यमवर्गाला फायदाच होतोय, असंही सितारामन म्हणाल्या आहेत. मध्यमवर्गीय जनतेसाठी जे जमेल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असंही सीतारमण् यांनी सांगितलं.

दरम्यान, आर्थिक वर्ष 2023 साठी जीडीपीचा (GDP Rate) अंदाज 7 टक्के असणार असल्याचं सांगण्यात आलंय. आयएमएफने (IMF) जारी केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा महागाई दर 6.8 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर येऊ शकतो. 2024 मध्ये ते 4 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. आयएएफच्या अहवाल जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक चलनवाढीचा दर 2022 मध्ये 8.8 टक्के होता. तर यंदाच्या वर्षीत हा दर 6.6 टक्के राहणार आहे.