चपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार

Chapati Dough Cooking Hacks: चपाती बनवताना जेवढा कंटाळा येत नाही तितका कंटाळा चपातीसाठी पीठ मळताना येतो. चुकुनजरी पिठात कमी जास्त पाणी पडलं तर झालं सगळ्या पिठाचा सत्यानाश..

Updated: May 23, 2023, 05:33 PM IST
चपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार  title=

How To Make Fluffy Chapati: गव्हाची पोळी खाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाहीय. पोळी खायला आवडतं पण, बनवायला कंटाळा येतो. (how to make chapati perfect soft) किंवा बनवताना नाकी नऊ येतात, अशीही बरीच मंडळी आपल्याकडे आहेत. वाकड्या तिकड्या कशाही पोळ्या जरी बनल्या गेल्या तरी त्या खूप वेळ ताज्या आणि मऊ राहतातच असं नाही. काही वेळाने या पोळ्या कडक होऊन जातात. 
 
पण काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या तुम्हीसुद्धा केल्यात तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ आणि लुसलुशीत होवू शकते शिवाय तासंनतास मऊच राहते. (Cooking Tips for kneading roti Dough Nicely For Round and Fluffy Chapati)

बऱ्याचदा चपाती भाजली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..

चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत.परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)

चपातीसाठी पीठ मळताना हात बरबटले जातात.ते साफ करता करता नाकी नऊ येतात, त्यात पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं, (kitchen tips) तर वैताग येतो. अश्यावेळी क्रमिक मळण्यासाठी एक आयडियाची कल्पना करून बघाच...

पीठ मळण्यासाठी दिड कप कणिक घ्या, अर्धा चमचा तेल,  पीठ मळताना नेहमी एक लक्षात ठेवा कधीही खोलगट (cooking hacks) भांड्याचा वापर करा.. आता या भांड्यात गव्हाचं पीठ घाला त्यात दोन चमचे तेल घाला.  (तेल घातल्याने पीठ मऊसर होते शिवाय याच्या चपात्या चांगल्या मऊसूद राहतात) आता लागेल तंस पाणी हळू हळू घालून घ्या...आता तुम्हाला कल्पनाही नसेल अशी एक गोष्ट तुम्हाला मदत करणार आहे... ते म्हणजे चपाती लाटण्याचं लाटणं...

हो, तुम्ही बरोबर वाचलं आहे, हे सर्व मिश्रण तुम्हाला लाटण्याच्या एका टोकाने गोल गोल फिरवायचं आहे,  एक लक्षात ठेवा एकाच  दिशेने तुम्हाला हे लाटण फिरवायचं आहे, लागेल तसं पाणी हळू हळू घाला आणि अवघ्या काही मिनिटांत पिठाचा मऊसूद आणि लाटायला सोपा गोळा तयार...