पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजची अर्थमंत्री सीतारमण आज देणार माहिती

कोरोनाच्या नव्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे.  

Updated: May 13, 2020, 12:16 PM IST
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजची अर्थमंत्री सीतारमण आज देणार माहिती  title=

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योग बंद अवस्थेत आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण  या याबाबत ठोस माहिती आणि कसे असेल पॅकेज याबाबत संवाद साधणार आहेत. अर्थमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. आधी एक वाजता त्या बोलणार होत्या. मात्र त्यांनी  पत्रकार परिषदेची वेळ बदलली असून दुपारी ४ वाजता साधणार संवाद साधणार आहेत.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले. आता हे पॅकेज नक्की कोणकोणत्या सेक्टरला दिले जाईल. शेतकरी, मध्यमवर्गाला काय मिळणार याची माहिती आज निर्मला सीतारमण आज देणार आहेत. यासंदर्भात अर्थमंत्री दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रदान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. जीडीपीच्या १० टक्के हे पॅकेज असणार आहे. या पॅकेजमुळे शेती, उद्योग, मजूर आणि मध्यम वर्गीयांना मदत होणार आहे. याबरोबरच मोदींनी आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केलीय. या माध्यमातून स्थानिक उद्योग आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याचं आवाहन मोदींनी केले आहे.